लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : तालुक्यातील दुधाळा येथे पाच नराधमांनी अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केला. ही घटना २९ डिसेंबरला घडली. या प्रकरणातील सर्व आराेपींना फाशी द्या, अशी मागणी बिरसा मुंडा ब्रिगेडच्यावतीने केली आहे. यासंदर्भात मंगळवारी (दि.५) उपविभागीय अधिकारी जाेगेंद्र कट्यारे यांना निवेदन साेपविण्यात आले.
या प्रकरणाचा तपास फास्ट ट्रॅक काेर्टामार्फत करण्यात यावा व आराेपींना फाशी देण्यात यावी. पीडित मुलीच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे शासनाने पीडितेच्या कुटुंबाला त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी. पीडित मुलीच्या पालकांना संरक्षण देण्यात यावे तसेच अशाप्रकारचा गुन्हा करणाऱ्यांविरुद्ध कठाेर पावले उचलावी, आदी मागण्या निवेदनाद्वारे केल्या आहे. निवेदन देताना बिरसा मुंडा ब्रिगेडचे अध्यक्ष संदीप इनवाते, उपाध्यक्ष संदीप मडावी, नाना मरसकाेल्हे, कन्हैया पंधराम, अनिल राैतेले, रामानंद अडामे, सरपंच नितीन गेडाम, प्रदीप काेडवते, पिंटू वरखडे, अशाेक काेडवते, धनू परतेती, रमेश इनवाते आदी उपस्थित हाेते.