शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी मुदगल यांच्या हस्ते ‘त्या’ शिक्षक पत्नींना प्रत्येकी १५ लाखाची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 00:37 IST

लोकसभा निवडणुकीचे कामकाज आटोपून घराकडे परतताना अपघातात मृत पावलेल्या दोन शिक्षकांच्या पत्नींना आज जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या हस्ते प्रत्येकी १५ लाखाच्या सानुग्रह अनुदानाचा धनादेश देण्यात आला.

ठळक मुद्देनिवडणूक काळातील चांपा शिवारात झाला होता कार अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीचे कामकाज आटोपून घराकडे परतताना अपघातात मृत पावलेल्या दोन शिक्षकांच्या पत्नींना आज जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या हस्ते प्रत्येकी १५ लाखाच्या सानुग्रह अनुदानाचा धनादेश देण्यात आला.यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा आणि उपविभागीय अधिकारी जे. पी. लोंढे उपस्थित होते.जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी योगिता नुकेश मेंढुले यांना तर अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके यांनी माधुरी पुंडलिक बाहे यांना भारतीय स्टेट बँकेच्या उमरेड शाखेत देय असलेले हे धनादेश वितरित केले.लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघाची पहिल्या टप्प्यात ११ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. पुंडलिक बापूराव बाहे (५६), रा. राहाटे ले-आऊट हे स्व. दामोधर खापर्डे विद्यालय, साळवा, ता. कुही येथे आणि नुकेश नारायण मेंढुले (३८) रा. भांडारकर ले-आऊट हे अशोक कन्या विद्यालय, उमरेड येथे कार्यरत होते. हे दोन्ही शिक्षक लोकसभा निवडणुकीचे कामकाज आटोपून घरी जात असताना उमरेड-नागपूर मार्गावर चांपा शिवारात त्यांच्या कारला अपघात झाला होता.

टॅग्स :Nagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालयTeacherशिक्षक