शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
2
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
3
२०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
4
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
5
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
6
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
7
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
8
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
9
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
10
नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
11
कर्ज, किडनी आणि गांजा : शेतकरी या मार्गाने का निघाले?
12
इस्त्रायलच्या सुंदर तरुणी सैनिक का बनतात? 
13
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
14
विनाशकारी विकासाला नकार! अरवलीचे संरक्षण म्हणजे विकासाला विरोध नव्हे...
15
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
16
राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना
17
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
18
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
19
येमेनच्या नागरिकाच्या अटकेचा भार सरकारी तिजोरीवर; खटला निकाली काढा, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
20
शिक्षक भरती : प्रमाणपत्र अटीमुळे मराठा उमेदवार होणार बेरोजगार? खुल्या प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

अपंग वन्यप्राण्यांना पाठविले महाराज बागेत

By admin | Updated: June 15, 2014 00:35 IST

पेंच एनक्लोजरमधील एका नर वाघाला वन विभागातर्फे पुणे येथील कात्रज प्राणिसंग्रहालयात पाठविण्यात येत असल्याची माहिती आहे. दरम्यान महाराज बाग प्रशासनाने वरिष्ठ वन अधिकाऱ्यांना

सुदृढ पाठवण्यास टाळाटाळ : प्राणिसंग्रहालय प्रशासनाने लिहिले नाराजी पत्र नागपूर : पेंच एनक्लोजरमधील एका नर वाघाला वन विभागातर्फे पुणे येथील कात्रज प्राणिसंग्रहालयात पाठविण्यात येत असल्याची माहिती आहे. दरम्यान महाराज बाग प्रशासनाने वरिष्ठ वन अधिकाऱ्यांना पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली आहे. सूत्रांनुसार प्राणिसंग्रहालयातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, वन विभागाल जेव्हा आजारी आणि अपंग वन्य प्राण्यांना देखरेखीसाठी ठेवायचे असते तेव्हा महाराज बागेची आठवण होते. परंतु जेव्हा सुदृढ वाघ देण्याची वेळ आली तेव्हा विदर्भाच्या बाहेर नर वाघ पाठविण्याबाबत विचार केला जात आहे. हा एकप्रकारे महाराज बागेसोबत सावत्र वागणुकीचा प्रकार आहे. प्राणिसंग्रहालयातील अधिकाऱ्यांनुसार वन विभागाच्या माध्यमातून प्राणिसंग्रहालयात ठेवण्यात आलेल्या तीन मादा वाघिणींंसाठीच पेंचमधील नर वाघ महाराज बागेत आणण्याचे प्रयत्न केले जात होते. यानंतरही नर वाघाला पुण्यातील कात्रज प्राणिसंग्रहालयाला देण्याचा निर्णय अयोग्य आहे. ३ नोव्हेंबर २००८ रोजी वन अधिकाऱ्यांनी चंद्रपूर येथील मेंढकी गावात आजारी पडलेल्या जाई व जुई या वाघिणीला गंभीर अवस्थेत महाराज बागेत आणण्यात आले होते. जुईचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. परंतु दुसरी वाघिण जाई ही आता ५ वर्षाची झाली आहे. तसेच २३ जानेवारी २००९ रोजी वन अधिकाऱ्यांनी आपल्या आईपासून दुरावलेल्या तीन आजारी वाघिणीला महाराज बागेत उपचारासाठी आणले. ली, जान आणि चेरी अशी त्यांची नावे ठेवण्यात आली होती. गेल्या वर्षी तीन वर्षाच्या चेरीला छत्तीसगड येथील प्राणिसंग्रहालयाला देण्यात आले. तिथे चेरीने एका वाघाला जन्म दिला. सध्या जान ४ वर्ष आणि जाई ५ वर्षाची झाली आहे. आता या वाघिणींना एका नर वाघाच्या सोबतीची गरज आहे. त्यादृष्टीने प्राणिसंग्रहालयाने वन विभागाला पेंच एनक्लोजरचा वाघ देण्याची मागणी केली होती. वन विभागाकडून ही मागणी पूर्ण होण्याची प्राणिसंग्रहालयाला अपेक्षाही होती. परंतु आता त्या वाघाला कात्रजला देण्यात येत असल्याच्या चर्चेने महाराज बागेतील वाघिणींना नर वाघाची साथ मिळण्याची अपेक्षा फोल ठरली आहे. का पाठविले जात आहे वाघाला प्राणिसंग्रहालयात पेंच एनक्लोजरमध्ये दोन वाघिण आणि एक नर वाघ आहे. यापैकी एका वाघिणीला तज्ज्ञांच्या टीमच्या रिपोर्टनुसार जंगलात सोडायचे आहे. परंतु नर वाघाला मात्र जंगलात सोडण्यास या टीमने अनफिट घोषित केले आहे. अशा परिस्थितीत त्या वाघाला जंगलात सोडता येणे शक्य नाही. त्यामुळे या वाघाला महाराज बाग किंवा कात्रज येथील प्राणिसंग्रहालयात पाठविण्याबाबत वन विभाग विचार करीत आहे. (प्रतिनिधी)