शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
5
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
6
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
7
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
8
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
9
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
10
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
11
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
12
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
13
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
14
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
15
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
16
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
17
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
18
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
19
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
20
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा

संघातील 'त्या' हातामुळेच आज सलामासाठी उठतात हात; मुख्यमंत्र्यांचं RSSला श्रेय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 16:19 IST

संघाच्या शाखेत मी वयाच्या सातव्या वर्षापासून जात होतो. चार ते पाच वर्षांच्या असताना संघाच्या विजयादशमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी शाखेत जायचो, संघाचा गणवेश मी परिधान करायचो.

ठळक मुद्देसंघाच्या शाखेत मी वयाच्या सातव्या वर्षापासून जात होतो.संघासमोर नतमस्तक झालेल्या या हातांमुळेच चांगले संस्कार मिळालेहिंदुत्व हे संकुचित असू शकत नाही. ज्या दिवशी ते संकुचित होतं तेव्हा ते हिंदुत्व राहत नाही.

नागपूरः संघाच्या शाखेत मी वयाच्या सातव्या वर्षापासून जात होतो. चार ते पाच वर्षांच्या असताना संघाच्या विजयादशमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी शाखेत जायचो, संघाचा गणवेश मी परिधान करायचो. घरासमोरच शाखा भरायची, संघासमोर नतमस्तक झालेल्या या हातांमुळेच चांगले संस्कार मिळाले आणि समाजासोबत जगायला शिकलो. त्याचाच फायदा जीवनात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या जागतिक मराठी संमेलनाच्या कार्यक्रमात बोलत होते. हिंदुत्व हे संकुचित असू शकत नाही. ज्या दिवशी ते संकुचित होतं तेव्हा ते हिंदुत्व राहत नाही. चर्चमध्ये वा मस्जिदमध्ये गेलो तिथे मला माझा देवच दिसतो. मी लहानपणापासूनच हेच शिकलो. भारतीय जीवनपद्धतीला नाकारण्याचा जिथे प्रयत्न होतो तिथे हिंदुत्व जागृत करावं लागतं. जिथे जीवनपद्धतीला नाकारलं जात नाही, तिथं सहिष्णुतेनं इतर जीवन पद्धतींना सन्मानाने स्वीकारणं हे हिंदुत्व आहे.राजकारणात काम करत असताना समाजात काम करण्याची वृत्ती जागी झाली. त्यामुळेच हा जो हात आहे तो घेण्याची संधी देखील प्राप्त झाली आहे. विरोधी पक्षात काम करत असताना संकल्पना मांडत असतो. परंतु सत्ता पक्षात गेल्यानंतर त्या संकल्पना पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, मात्र यंत्रणेकडून म्हणावी तशी गती मिळाली नाही. यंत्रणा साथ देत नव्हती. 2014च्या निवडणुकीतही मी एक व्हिजन डॉक्युमेंट केलं होतं. तसा एक कार्यक्रमदेखील मी केला होता. ते व्हिजन डॉक्युमेंट कसं सत्यात उतरवता येईल, याचाही मी विचार केलेला होता. त्यावेळेस मांडलेली गोष्ट पूर्ण केली आहे.

मागील 4 वर्षांत प्रशासनावरील पकड मजबूत झाली आणि त्रास सहन करण्याची क्षमतादेखील वाढली. नोकरशाहीतील 50 टक्के आरक्षण दिलं जातं. सरकारी नोकऱ्यांपेक्षा खासगी क्षेत्रात जास्त संधी आहेत. आरक्षण मिळाले तरी नोकऱ्यांत फारसा फायदा नाही. आरक्षणामुळे मनाचे समाधान होते. पुढील 5 ते 10 वर्षांत आरक्षणाचे महत्व व माहात्म्य कमी होईल. सामाजिक आरक्षण बाजूला सारून आर्थिक आरक्षणाकडे जाण्याची वेळ अद्याप आलेली नाही. सर्वच समाजात संकुचित मानसिकता वाढणे हा चिंतेचा विषय आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस