शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

क्वारंटाईन स्टॅम्पमुळे हातावर जखम; पुण्याहून नागपुरात आलेल्या दाम्पत्याला घ्यावा लागला उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 12:24 IST

दुसऱ्या जिल्ह्यासह इतर राज्यातून येणाऱ्या प्रवाशांच्या हातावर मारला जाणाऱ्या होम क्वारंटाईनच्या स्टॅम्पमुळे जखमा होऊ लागल्या आहेत. पुणे येथून नागपुरात आलेल्या एका दाम्पत्याच्या हातावर असाच स्टॅम्प मारल्यानंतर हातावर सूज येऊन त्यात पस जमा झाला. अखेर या दाम्पत्याला डॉक्टरांकडून उपचार घेण्याची वेळ आली.

ठळक मुद्देविमानतळावर मारला क्वारंटाईनचा स्टॅम्प

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दुसऱ्या जिल्ह्यासह इतर राज्यातून येणाऱ्या प्रवाशांच्या हातावर मारला जाणाऱ्या होम क्वारंटाईनच्या स्टॅम्पमुळे जखमा होऊ लागल्या आहेत. पुणे येथून नागपुरात आलेल्या एका दाम्पत्याच्या हातावर असाच स्टॅम्प मारल्यानंतर हातावर सूज येऊन त्यात पस जमा झाला. अखेर या दाम्पत्याला डॉक्टरांकडून उपचार घेण्याची वेळ आली.लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्याने प्रवासाचा मार्ग मोकळा झाला आहे. विमानसेवा, रेल्वेसेवा सुरू झाल्याने जे लॉकडाऊनमध्ये विविध शहरात अडकले होते, ते आता घरी परतू लागले आहेत. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वेस्थानक व विमानतळावर अशा प्रवाशांच्या हातावर १४ दिवसाचे होम आयसोलेशन म्हणजेच क्वारंटाईनचा स्टॅम्प मारला जात आहे. मुंबई येथे नोकरी करणारे स्नेहा मून व राकेश मून यांचे चंद्रपूरला घर आहे. ते ५ जून रोजी घरी येण्यासाठी मुंबई ते पुणे आणि पुण्यावरून विमानाने नागपूरला पोहचले. विमानतळावर उतरल्यावर सर्व सोपस्कार पूर्ण केल्यानंतर दोघांच्या हातावर क्वारंटाईनचा स्टॅम्प मारण्यात आला. दोघांच्या हातावर स्टॅम्प मारलेल्या जागेवर सायंकाळी सूज आली. त्यांनी कुटुंबातील डॉ. सिद्धांत भरणे यांना फोनवरून याची माहिती दिली. दुसऱ्या दिवशी स्टॅम्प जागेवर जखम होऊन पस भरला. दोघांच्या हातावर सारखीच जखम झाली. डॉ. भरणे यांनी त्यांच्यावर उपचाराला सुरुवात केली. स्टॅम्पच्या नाहक त्रासाला या दाम्पत्याला सामोरे जावे लागले.

स्ट्राँग केमिकल्समुळे व ज्यांना अ‍ॅलर्जी आहे त्यांना त्रास होतो१४ दिवसापर्यंत शाई हातावर टिकावी यासाठी स्ट्राँग केमिकल्स असलेल्या शाईचा बहुदा वापर केला जात असावा. ज्यांना अ‍ॅलर्जी आहे त्यांना या शाईचा त्रास होऊ शकतो. याला वैद्यकीय भाषेत ‘अ‍ॅलर्जीक कॉन्टॅक्टडर्मेटायटीस’ असे म्हटले जाते. यात रुग्णाच्या हाताला सूज येऊन, पस तयार होतो. यावर उपचार आवश्यक आहे.-डॉ. जयेश मुखीत्वचारोग तज्ज्ञ, मेडिकल.

आरोग्य अधिकाऱ्यांना कळविलेयाप्रकारची आणखी एक तक्रार आली होती. यासंबंधात आम्ही आरोग्य अधिकाऱ्यांना कळविले आहे.-आबिद रुही,वरिष्ठ विमानतळ संचालक

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस