शहरं
Join us  
Trending Stories
1
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
2
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
3
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
4
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
5
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
6
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
7
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
8
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
9
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
10
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
11
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
12
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
13
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
14
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
15
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
16
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
17
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
18
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
19
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
20
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण

स्पाईस जेटला ग्राहक मंचचा दणका : ५५ हजार रुपये भरपाई देण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 22:11 IST

अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने दोन ग्राहकांची तक्रार अंशत: मंजूर करून त्यांना आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रासापोटी ५० हजार आणि तक्रारीच्या खर्चापोटी पाच हजार अशी एकूण ५५ हजार रुपये भरपाई देण्यात यावी असा आदेश स्पाईस जेट या विमान सेवा कंपनीला दिला. त्यामुळे कंपनीला जोरदार दणका बसला. या आदेशावर अंमलबजावणी करण्यासाठी कंपनीला ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

ठळक मुद्देतक्रार अंशत: मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने दोन ग्राहकांची तक्रार अंशत: मंजूर करून त्यांना आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रासापोटी ५० हजार आणि तक्रारीच्या खर्चापोटी पाच हजार अशी एकूण ५५ हजार रुपये भरपाई देण्यात यावी असा आदेश स्पाईस जेट या विमान सेवा कंपनीला दिला. त्यामुळे कंपनीला जोरदार दणका बसला. या आदेशावर अंमलबजावणी करण्यासाठी कंपनीला ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.मंचचे अध्यक्ष शेखर मुळे, सदस्य अविनाश प्रभुणे व दीप्ती बोबडे यांनी हा निर्णय दिला. रसिक व मिनौती नशिने अशी ग्राहकांची नावे असून ते गांधीनगर येथील रहिवासी आहेत. तक्रारीतील माहितीनुसार, या ग्राहकांनी १ ते १० एप्रिल २०१६ पर्यंत भारताच्या उत्तर-पूर्व भागात पर्यटनासाठी जायचे ठरवले होते. बागडोगरा ते कोलकाता व कोलकाता ते नागपूर असा त्यांचा परतीचा प्रवास होता. त्याकरिता त्यांनी स्पाईस जेट कंपनीची तिकिटे खरेदी केली होती. त्यावेळी त्यांना कंपनीची विमाने वेळेवर उडत असल्याची माहिती देण्यात आली होती. ते १० एप्रिल २०१६ रोजी बागडोगरा विमानतळावर गेले असता विमानाला विलंब होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांना कोलकाता येथे ५ तास ४० मिनिटे विलंबाने पोहोचविण्यात आले. परिणामी, ते कोलकाता-नागपूर विमान पकडू शकले नाही. त्यांना कोलकाता येथे हॉटेलमध्ये राहण्याचा व भोजनाचा अतिरिक्त खर्च सोसावा लागला. तसेच, नागपूरला परतण्यासाठी नवीन तिकिटे खरेदी करावी लागली. याची भरपाई मिळावी म्हणून त्यांनी स्पाईस जेट कंपनीला पत्र लिहिले होते, पण त्याचे उत्तर मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी मंचमध्ये तक्रार दाखल केली होती. तक्रारकर्त्यांतर्फे अ‍ॅड. सुरेंद्र खरबडे यांनी बाजू मांडली.कंपनीने उदासीनता दाखवलीविमान रद्द झाल्यास किंवा विलंब होत असल्यास प्रवाशांना योग्य माहिती देण्याचे व त्यांची योग्य सोय करण्याचे निर्देश डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एविएशन यांनी जारी केले आहेत. परंतु, स्पाईस जेट कंपनीने त्याचे पालन केले नाही. त्यानंतर तक्रारकर्त्यांनी पाठविलेल्या पत्राला उत्तरही दिले नाही. त्यावरून कंपनीची उदासीनता स्पष्ट होते असे निरीक्षण मंचने निर्णयात नोंदविले.

टॅग्स :spicejetस्पाइस जेटNagpur District Additional Consumer Forumनागपूर जिल्हा अतिरिक्त ग्राहक तक्रार निवारण मंच