शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील कुख्यात संतोष आंबेकरच्या चारमजली इमारतीवर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 00:20 IST

कुख्यात गुंड संतोष आंबेकर याचा दारोडकर चौकाजवळील गांधीबाग झोनअंतर्गत असलेला आलिशान बंगल्याला मनपातर्फे काही महिन्यांपूर्वीच नेस्तनाबूद करण्यात आले. त्याच बंगल्याच्या शेजारी त्याच्या पत्नीच्या नावे असलेल्या २५00 चौ.फूट क्षेत्रावरील चारमजली इमारतीचे अतिक्रमण तोडण्यास मनपाच्या अक्रिमण पथकाने सोमवारी सुरुवात केली.

ठळक मुद्देकाही महिन्यात दुसऱ्या बंगल्यावर कारवाई : अडीच हजार वर्गफूट क्षेत्रात अनधिकृत बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुख्यात गुंड संतोष आंबेकर याचा दारोडकर चौकाजवळील गांधीबाग झोनअंतर्गत असलेला आलिशान बंगल्याला मनपातर्फे काही महिन्यांपूर्वीच नेस्तनाबूद करण्यात आले. त्याच बंगल्याच्या शेजारी त्याच्या पत्नीच्या नावे असलेल्या २५00 चौ.फूट क्षेत्रावरील चारमजली इमारतीचे अतिक्रमण तोडण्यास मनपाच्या अक्रिमण पथकाने सोमवारी सुरुवात केली. पुढील चार ते पाच दिवस ही कारवाई चालणार आहे. आंबेकरची नागपूर शहरात एकच मालमत्ता नसून अनेक हडपलेल्या मालमत्ता आहेत. जुन्या बंगल्याशेजारीच त्याचे पुन्हा एक अनधिकृत चारमजली बांधकाम आहे, जे त्याची पत्नी नेहा संतोष आंबेकर हिच्या नावे आहे. त्याचा घर क्रमांक ४८४ असा आहे. सदर भाग हा झोपडपट्टीअंतर्गत येत असल्याने मनपाने ११ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र स्लम अ‍ॅक्टच्या कलम ३ झेड-१ अंतर्गत नेहा आंबेकर यांना नोटीस बजावली होती. सदर नोटिशीला नेहा आंबेकर यांनी मनपाच्या कार्यकारी अभियंता (स्लम) यांच्याकडे प्रथम अपील दाखल केले होते. मालमत्तेसंदर्भात कुठलीही अधिकृत कागदपत्रे नसल्याने सदर अपील फेटाळण्यात आली. त्यानंतर नेहा आंबेकर यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी (महसूल) यांच्याकडे द्वितीय अपील दाखल केले. मनपा आणि आंबेकर या दोघांचीही बाजू ऐकून घेतल्यानंतर नेहा आंबेकर यांचे अपील अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी खारीज केले.

यापूर्वी तोडण्यात आलेल्या बंगल्यामधील सामान पोलिसांच्या गुन्हे शाखेने या घरात ठेवले होते. घराला सील करण्यात आले होते. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी अपील फेटाळताच गुन्हे शाखेचे उपायुक्त राजमाने यांच्याशी संपर्क साधून या बंगल्यामधील संपूर्ण सामान काढण्याबाबत मनपाने सूचित केले. गुन्हे शाखेने तात्काळ तेथील सामान काढून घर तोडण्याच्या कारवाईसाठी वाट मोकळी करून दिली. त्यानुसार मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथकाने सोमवारी सकाळी इमारत तोडण्याला सुरुवात केली. विशेष म्हणजे सैय्यद साहिल या कुख्यात गुंडाचा बंगलासुद्धा काही दिवसांपूर्वीच मनपाने जमीनदोस्त केला होता. सदर कारवाई महापौर संदीप जोशी, आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या नेतृत्वात गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त अशोक पाटील, कनिष्ठ अभियंता बलेर्वार, मुख्यालयातील कांबळे यांनी केली. पोलिस विभागानेसुद्धा सुरक्षेच्या दृष्टीने योग्य बंदोबस्त उपलब्ध करून देत या कारवाईत सहकार्य केले.२३१.७७ वर्ग मीटर अवैध बांधकामतळमजला जवळपास २३१.७७ वर्ग मीटर अर्थात सुमारे अडीच हजार वर्गफूट बांधकामाचे क्षेत्र असलेले चारमजली घर असून त्यावर मनपाचा हातोडा चालविण्यात आला. दाटीवाटीच्या क्षेत्रात हे घर असल्याने संपूर्ण घर तोडण्यास पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणnagpurनागपूर