शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात अवैध धार्मिक स्थळे व अतिक्रमणांवर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 22:37 IST

रहदारीच्या व वर्दळीच्या भागात, तसेच फूटपाथवर अतिक्रमण करून उभारण्यात आलेली धार्मिक स्थळे हटविण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिले होते़ अशाच स्वरुपाचे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार अवैध धार्मिक स्थळ हटविण्याची मोहीम सुरू केली आहे.

ठळक मुद्देझोन स्तरावर यादी तयारदोन धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविलेरस्त्यांवरील अतिक्रमणाचाही सफाया : ६० ठेले जप्त

आॅनलाईन लोकमतनागपूर : रहदारीच्या व वर्दळीच्या भागात, तसेच फूटपाथवर अतिक्रमण करून उभारण्यात आलेली धार्मिक स्थळे हटविण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिले होते़ अशाच स्वरुपाचे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार अवैध धार्मिक स्थळ हटविण्याची मोहीम सुरू केली आहे. लक्ष्मीनगर झोनच्या पथकाने कारवाईला सुरुवात केली. व्हीएनआयटी प्रवेशद्वाराजवळील धार्मिक स्थळाचे अतिक्रमण हटविले. दुसऱ्या दिवशी धरमपेठ झोनने बोले पेट्रोल पंपाजवळील धार्मिक स्थळाचे अतिक्रमण हटविले. सोमवारपासून शहराच्या विविध भागात अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या धाार्मिक स्थळांवर पोलीस बंदोबस्तात हातोडा चालविला जाणार आहे. सोबतच अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवरील अतिक्रमणाचा सफाया केला जात आहे.गेल्यावर्षी न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने कारवाईला सुरुवात केली होती. शहरातील काही अनधिकृत धार्मिक स्थळे हटविली. मंदिर, चबुतरे, ओटे, फलक आदी हटविण्यात आले होते. मिठानीम दर्गासमोरील रस्ता दुभाजकावरील भाग मोकळा करण्यात आला होता़. वाहतुकीला अडथळा ठरणारी धार्मिक स्थळे हटविणार असल्याचे प्रतिज्ञापत्र महापालिकेने न्यायालयात सादर केले होते़ न्यायालयाच्या आदेशानंतर अनधिकृत धार्मिक स्थळांवर हातोडा चालविला़ मात्र कारवाईला मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता़ यामुळे मोहीम थांबविण्यात आली होती.दरम्यान राज्य शासनाने ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याबाबतचे निर्देश दिले होते. परंतु काही धार्मिक स्थळांच्या नियमितीकरणासाठी प्रयत्न सुरू झाल्याने शहरातील सर्व धार्मिक स्थळांची यादी तयार करण्यात आली. यासाठी दहा महिने लागले़ तसेच महापालिका निवडणुका झाल्यामुळे प्रक्रियेला विलंब लागला़ आता सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. अनधिकृत धार्मिक स्थळावंर कारवाईला सुरुवात झाली आहे. सोमवारपासून व्यापक प्रमाणात कारवाई केली जाणार आहे.नागपूर शहरात १,५७६ अनधिकृत धार्मिकस्थळे शहरात २००९ पूवीर्ची १ हजार ५२१ व २००९ नंतरची ५५ अनधिकृत धार्मिक स्थळे असल्याची मनपात नोंद आहे़ यातील १७ अतिप्राचीन स्थळांचा समावेश ‘अ’ श्रेणीत असल्यामुळे त्यांना नियमित करण्यात आले़ मंगळवारी झोनमधील दोन धार्मिक स्थळांचे स्थलांतरण करण्यात आले़ १७५ धार्मिक स्थळे १ मे १९६० पूवीर्ची आहेत़ दरम्यान अनधिकृत धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापनाला नोटीस बजावण्यात आली.

 

 

टॅग्स :nagpurनागपूर