शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

अष्टविनायक डेव्हलपर्सला ग्राहक मंचचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 21:28 IST

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने तक्रारकर्त्या ग्राहकाच्या हिताचे आदेश जारी करून व ग्राहकाला ४० हजार रुपये भरपाई मंजूर करून अष्टविनायक डेव्हलपर्सला जोरदार दणका दिला. गिरीश जयस्वाल व अजय जयस्वाल हे अष्टविनायक डेव्हलपर्सचे भागीदार आहेत.

ठळक मुद्देग्राहक हिताचे आदेश : ४० हजार रुपये भरपाईही मंजूर केली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने तक्रारकर्त्या ग्राहकाच्या हिताचे आदेश जारी करून व ग्राहकाला ४० हजार रुपये भरपाई मंजूर करून अष्टविनायक डेव्हलपर्सला जोरदार दणका दिला. गिरीश जयस्वाल व अजय जयस्वाल हे अष्टविनायक डेव्हलपर्सचे भागीदार आहेत.प्रमिला अवचट असे ग्राहकाचे नाव असून त्या वणी, जि. यवतमाळ येथील रहिवासी आहेत. अष्टविनायक डेव्हलपर्स व भागीदारांनी अवचट यांच्याकडून उर्वरित २ लाख ४ हजार रुपये स्वीकारून त्यांना बेसा येथील अष्टविनायक एम्पायर योजनेतील सदनिकेचे विक्रीपत्र नोंदवून द्यावे व सदनिकेचा ताबा द्यावा किंवा हे शक्य नसल्यास अवचट यांना त्यांच्याकडून घेतलेले १६ लाख ४५ हजार रुपये १५ टक्के व्याजासह परत करण्यात यावेत असे आदेश मंचने दिलेत. व्याज ९ जुलै २०१४ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत लागू करण्यात आले आहे व डेव्हलपर्सने विक्रीपत्र नोंदवून दिल्यास त्याचा खर्च अवचट यांना करावा लागणार आहे. अवचट यांना शारीरिक-मानसिक त्रास व तक्रारीचा खर्च म्हणून एकूण ४० हजार रुपये भरपाई मंजूर करण्यात आली आहे. ही रक्कम डेव्हलपर्सने द्यायची आहे. मंचचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य नितीन घरडे व चंद्रिका बैस यांनी हा निर्णय दिला. निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी अष्टविनायक डेव्हलपर्सला ३० दिवसाची मुदत देण्यात आली.तक्रारीतील माहितीनुसार,अवचट यांनी संबंधित सदनिका १८ लाख ४९ हजार रुपयांत खरेदी करण्यासाठी २ डिसेंबर २०१० रोजी अष्टविनायक डेव्हलपर्ससोबत करार केला. करारामध्ये १८ महिन्यात पूर्ण रक्कम अदा करण्याचे व त्यानंतर विक्रीपत्र नोंदविण्याचे नमूद करण्यात आले होते. त्यानुसार अवचट यांनी जानेवारी-२०१६ पर्यंत सदनिकेची संपूर्ण रक्कम डेव्हलपर्सला अदा केली व सदनिकेचे विक्रीपत्र करून देण्याची मागणी केली. परंतु, डेव्हलपर्सने त्याकडे दूर्लक्ष केले. तसेच, करारानुसार योजनेचे काम वेळेत पूर्ण केले नाही व आवश्यक सुविधाही उपलब्ध करून दिल्या नाहीत. अवचट यांनी बजावलेल्या कायदेशीर नोटीसलादेखील प्रतिसाद दिला नाही. परिणामी, अवचट यांनी ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत मंचमध्ये तक्रार दाखल केली होती. मंचने विविध बाबी लक्षात घेता ती तक्रार अंशत: मंजूर करून हा निर्णय दिला.दोषपूर्ण सेवा दिल्याचे निरीक्षणअष्टविनायक डेव्हलपर्सच्यावतीने ग्राहक अवचट यांना दोषपूर्ण सेवा देण्यात आली असे निरीक्षण मंचने निर्णयात नोंदवले. डेव्हलपर्सने करारात ठरल्याप्रमाणे निर्धारित वेळेत सदनिकेचे बांधकाम पूर्ण केले नाही. अवचट यांना विक्रीपत्र नोंदवून सदनिकेचा ताबा दिला नाही. तसेच, योजनेमध्ये आवश्यक सोयीसुविधाही उपलब्ध करुन दिल्या नाहीत. ही डेव्हलपर्सच्या सेवेतील त्रुटी आहे. यावरून डेव्हलपर्सने अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केल्याचे व अवचट यांना दोषपूर्ण सेवा दिल्याचे सिद्ध होते असेही मंचने निर्णयात म्हटले.

 

टॅग्स :Nagpur District Consumer Forumनागपूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचconsumerग्राहक