शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

अर्ध्या तासाच्या पावसाने नागपूरला धुतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 23:08 IST

अर्ध्या तासाच्या पावसामुळे अशी अवस्था झाली तर मुसळधार पाऊस झाल्यास काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यासोबतच मनपाच्या मान्सूनपूर्व तयारीचा फज्जा उडाल्याचे चित्र गेल्या दोन दिवसात बघायला मिळाले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मान्सून राज्यात सक्रिय झाला आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास जोराचा पाऊस झाल्याने शहरातील अनेक वस्त्या जलमय झाल्या. अर्ध्या तासाच्या पावसाने जागोजागी पाणी तुंबले. साचलेले पाणी काढण्यासाठी मनपाच्या अग्निशमन व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. अर्ध्या तासाच्या पावसामुळे अशी अवस्था झाली तर मुसळधार पाऊस झाल्यास काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यासोबतच मनपाच्या मान्सूनपूर्व तयारीचा फज्जा उडाल्याचे चित्र गेल्या दोन दिवसात बघायला मिळाले.

नंदनवन कॉलनी, राजेंद्रनगर चौक, दर्शन कॉलनी, बालाजीनगर, शास्त्रीनगर, हिवरी ले -आऊट आदी वस्त्यात पाणी साचले होते. सिमेंट रोडचे अर्धवट काम असलेल्या अयोध्यानगर येथील गजानन शाळेजवळ पाणी तुंबले होते. एलआयसी चौक, भांडे प्लॉट, सदर कॉलनी, चिटणवीसनगर, टेलिकॉमनगर, मेडिकल चौक, शंकरनगर चौक, जगनाडे चौक यांसह शहरातील अनेक वस्त्या, रस्ते व चौकात पाणी साचले होते. जरीपटका, सेंट्रल एव्हेन्यू मार्गावर पाणी तुंबले होते. सदर येथील कॉफी हाऊस व दूध डेअरीजवळ झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर साचलेले पाणी कमी झाले. मनपा प्रशासनाने शहरातील पावसाळी नाल्या, गडरलाईन व त्यातील नाले स्वच्छ केल्याचा दावा केला आहे. परंतु दोन दिवसाच्या पावसात पावसाळी नाल्या स्वच्छ झाल्या नसल्याचे स्पष्ट झाले आहे.नाल्याच्या पुराचे पाणी तुंबल्याने राजेंद्रनगर, नंदनवन परिसरात पाणी साचले होते. पावसाचा जोर कमी झाल्यावर साचलेले पाणी निघून गेले. काही ठिकाणी पावसाळी नाल्यात कचरा व गाळ साचून असल्याने तर कुठे सिमेंट रस्त्यांच्या अर्धवट कामामुळे लोकांच्या घरात पाणी शिरले.१४.२ मिमी पावसाची नोंदसलग दुसऱ्या दिवशी उपराजधानीत मान्सून जोरदार बरसला. दुपारी पाऊण तासात पावसाचा जोर जास्त होता. रात्री ८.३० वाजेपर्यंत शहरात १४.२ मिमी पावसाची नोंद झाली. शिवाय आर्द्रतेतदेखील वाढ झाली. सकाळी ८.३० वाजता ९५ टक्के तर सायंकाळी ९६ टक्के आर्द्रता नोंदविण्यात आली. बंगालच्या उपसागरात कमी दबावाचे क्षेत्र तयार होत आहे. त्यामुळे दोन दिवसानंतर विदर्भासह मध्य भारतात पावसाचा जोर वाढू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.दरम्यान, शहरात रविवारच्या तुलनेत जास्त थंडावा होता. कमाल तापमानात २.८ अंश सेल्सिअसची घट झाली व ३२.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. किमान तापमान २४.२ अंश सेल्सिअस इतके होते.

टॅग्स :Rainपाऊसnagpurनागपूर