शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हलबा समाज भाजपाला झटका देण्याच्या मूडमध्ये 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 21:32 IST

हलबा समाजाबाबत शहर भाजपा चिंतित आहे. पक्षाचे नेते आपली मजबूत व्होट बँक वाढविण्यासाठी प्रयत्नरत आहेत. मात्र, न्यायालयाच्या निर्णयाचा पेच कायम आहे. दरम्यान, माजी आमदार डॉ. यशवंत बाजीराव यांनी हलबा समाजाच्या समस्या सोडविण्यात भाजपाला अपयश आल्याचा ठपका ठेवत भाजपाचा राजीनामा दिला आहे.

ठळक मुद्देमाजी आमदार यशवंत बाजीराव यांचा राजीनामा : कुंभारेंनीही व्यक्त केली नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हलबा समाजाबाबत शहर भाजपा चिंतित आहे. पक्षाचे नेते आपली मजबूत व्होट बँक वाढविण्यासाठी प्रयत्नरत आहेत. मात्र, न्यायालयाच्या निर्णयाचा पेच कायम आहे. दरम्यान, माजी आमदार डॉ. यशवंत बाजीराव यांनी हलबा समाजाच्या समस्या सोडविण्यात भाजपाला अपयश आल्याचा ठपका ठेवत भाजपाचा राजीनामा दिला आहे.बाजीराव यांनी बुधवारी भाजपाचे शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे यांच्याकडे पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सादर केला. बाजीराव यांनी सांगितले की, भाजपाने हलबा समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र व जाती वैधता मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात तसे झाले नाही. त्यामुळे समाजाला विविध योजनांचा फायदा मिळालेला नाही. दुसरीकडे एसटी प्रमाणपत्राच्या आधारावर नोकरी मिळविणाऱ्यांची पदोन्नती होत आहे तर हलबा युवकांना नोकºया मिळेनाशा झाल्या असून अनेकांची असलेली नोकरी धोक्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सूत गिरणी कामगारांना १४० दिवसांचा पगार, ग्रॅच्युईटी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, तसे झाले नाही. भाजपा सरकार हलबा समाजावर अन्याय करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.बाजीराव यांनी राजीनामा देण्यापूर्वी समाजातील काही नेत्यांकडे आपली नाराजी व्यक्त केली. भाजपाचे मध्य नागपुरातील आमदार विकास कुंभारे यांनी देखील समाजाच्या संमेलनात भाजपाला हलबांच्या प्रश्नावरून इशारा दिला आहे. हलबा समाजाचे म्हणणे आहे की, भाजपाने त्यांना महापौरपद दिले. मात्र, जात प्रमाणपत्र नसल्यामुळे तीन महिन्यातच पद गमवावे लागले होते.बाजीराव यांना पक्ष काढणारच होता : कुंभारे आ. विकास कुंभारे म्हणाले, हलबा समाज भाजपासोबत आहे. समाजाला न्यायालयामार्फत न्याय मिळवून देण्यासाठी भाजपा प्रयत्नरत आहे. आपण यासंबंधी कामासाठी सोमवारी दिल्ली येथे जात आहोत. डॉ. बाजीराव हे बऱ्याच दिवसांपासून सक्रिय नाहीत. महापालिकेच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसला मदत केली होती. पक्ष त्यांच्यावर कारवाई करणारच होता. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला, असा दावा कुंभारे यांनी केला.

टॅग्स :BJPभाजपाnagpurनागपूर