शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

हजचा खासगी कोटा पाच टक्केपेक्षा जास्त नको : जमाल सिद्दीकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 20:40 IST

यंदा हजसाठी २५ हजार सीट वाढल्या असल्या तरी त्याचा पाहिजे तसा लाभ गरीब हाजींना मिळणार नाही. कारण कोटा कमी आहे. एकट्या महाराष्ट्रातच २१ हजार वेटिंग लिस्ट आहे. त्यासाठी कोटा वाढवण्याची गरज आहे. खासगी टूर्स गरीब हाजींना मारक आहे. ते केवळ व्यापार करीत आहेत. खासगी टूर्ससाठी ३० टक्के इतका कोटा आहे, तो अतिशय जास्त आहे. त्यामुळे हा कोटा कमी करण्यात यावा. खासगी टूर्संना पाच टक्केपेक्षा जास्त कोटा देण्यात येऊ नये, अशी मागणी महाराष्ट्र राज्य हज समितीचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी पत्रपरिषदेद्वारा केली.

ठळक मुद्देखासगी टूर्स गरीब हाजींना मारक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यंदा हजसाठी २५ हजार सीट वाढल्या असल्या तरी त्याचा पाहिजे तसा लाभ गरीब हाजींना मिळणार नाही. कारण कोटा कमी आहे. एकट्या महाराष्ट्रातच २१ हजार वेटिंग लिस्ट आहे. त्यासाठी कोटा वाढवण्याची गरज आहे. खासगी टूर्स गरीब हाजींना मारक आहे. ते केवळ व्यापार करीत आहेत. खासगी टूर्ससाठी ३० टक्के इतका कोटा आहे, तो अतिशय जास्त आहे. त्यामुळे हा कोटा कमी करण्यात यावा. खासगी टूर्संना पाच टक्केपेक्षा जास्त कोटा देण्यात येऊ नये, अशी मागणी महाराष्ट्र राज्य हज समितीचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी पत्रपरिषदेद्वारा केली.महाराष्ट्रातूनच यंदा तब्बल १४,९९५ मुस्लीम बांधव हजयात्रेला जाणार आहेत. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून हजसाठी विमानसेवा सुरु होईल. नागपूर येथून ४९६ (जनरल कोटा) आणि ७० वर्षावरील नागरिकांच्या कोट्यातून १३८ लोक हजसाठी जाणार आहेत. यंदा आॅनलाईन रिपोर्टिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे हाजींना आधीच येण्याची गरज राहणार नाही. तसेच सर्व व्यवस्था हज समितीचे सदस्य करतील. त्यासाठी एनजीओची मदत घेतली जाईल. हजयात्रेकरुंना कुठलाही त्रास होऊ नये. यासाठी स्वयंसेवक स्वरुपात ‘हाजी दोस्त’ तयार करण्यात येतील. तसेच हाजींचे सामान दोन दिवसांपूर्वीच सौदीला पाठवण्यात यावे तसेच हजयात्रेकरूंसाठी सौदी अरेबियामध्ये हैदराबादच्या निजामांची स्वत:ची इमारत आहे. त्याचप्रमाणे भारत सरकारनेही स्वत:ची इमारत तिथे बांधावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली असल्याचे सिद्दीकी यांनी सांगितले.जुनैद खान, रहीम भाई उपस्थित होते.प्रत्येक जिल्ह्यात व्हावे हज हाऊसनागपूर व औरंगाबाद येथे हज हाऊस आहे. परंतु राज्य कमिटीचे स्वत:चे हज हाऊस नाही. मुंबईसह प्रत्येक जिल्ह्यात एक हज हाऊस व्हावे, अशी आपली इच्छा असून तसा प्रस्ताव सरकारला सादर करण्यात येणार असल्याचे सिद्दीकी यांनी सांगितले. हज हाऊस हे केवळ हाजींसाठीच काम करण्यापुरते राहू नये. तर वर्षभर येथून समाजोपयोगी कार्य चालावे, असे आमचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी हज हाऊसमध्ये स्पर्धा परीक्षा, आयएएस कोचिंग सेंटर सुरु करण्यात येत आहे. हजच्या नावावर काही ट्रॅव्हल्स कंपन्या फसवणूक करतात. ते रोखण्यासाठी हज कमिटी स्वत:च वर्षभर हजला जाणाऱ्या यात्रेकरुंसाठी काम करण्याचा विचार करीत आहे.

टॅग्स :Haj yatraहज यात्राnagpurनागपूर