शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीशी शरीरसंबंध ठेवले; लग्नाचा विषय काढताच दूर लोटले

By दयानंद पाईकराव | Updated: June 27, 2023 18:55 IST

Nagpur News नातेवाईकांकडे भेट झालेल्या १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीची एका युवकासोबत ओळख झाली. प्रेम संबंध झाल्यानंतर युवकाने लग्नाचे आमीष दाखवून शरीर संबंध प्रस्थापित केले. परंतु लग्न करण्यास नकार दिल्यामुळे मुलीने पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.

दयानंद पाईकराव नागपूर : नातेवाईकांकडे भेट झालेल्या १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीची एका युवकासोबत ओळख झाली. प्रेम संबंध झाल्यानंतर युवकाने लग्नाचे आमीष दाखवून शरीर संबंध प्रस्थापित केले. परंतु लग्न करण्यास नकार दिल्यामुळे मुलीने पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. जरीपटका ठाण्याच्या उपनिरीक्षक रुपाली भगत यांनी आरोपी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास गजाआड केले आहे.

तुषार प्रभाकर मेश्राम (वय २६, रा. सिद्धार्थनगर टेका पाचपावली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. १६ वर्षाची अल्पवयीन मुलगी कल्याणीची (बदललेले नाव) ८ नोव्हेंबर २०१९ रोजी आपल्या मोठ्या आईकडे आरोपी तुषारसोबत ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. आरोपी तुषार ट्रेडिंग क्लासेसला शिकत आहे. तर कल्याणी बीबीसीएच्या द्वितीय वर्षाला शिकत आहे. आरोपीसोबत ओळख झाली तेंव्हा तिचे वय १६ वर्ष होते. आरोपीने ती अल्पवयीन असल्याचा फायदा घेत तिला लग्नाचे आमीष दाखवून तिच्यासोबत शारिरीक संबंध प्रस्थापित केले.

चार वर्ष त्याने तिचे शारिरीक शोषण केले. परंतु कल्याणीने लग्नाचा विषय काढला असता आरोपीने टाळाटाळ केली व शेवटी लग्नास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे कळताच कल्याणीने जरीपटका ठाण्यात तक्रार दिली. जरीपटका पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३७६ (२), (एन), सहकलम ४, ६ पोक्सो अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. तपास उपनिरीक्षक रुपाली भगत करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग