शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

गुरूपौर्णिमा विशेष; तरुणाईच्या ध्येयातून साकारले वंचित मुलांचे ज्ञानमंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 10:22 IST

आर्थिक परिस्थितीमुळे कधी शिक्षणाचा मार्ग थांबतो किंवा सोईसुविधांच्या अभावामुळे तो माघारला जातो. शहरातील रामबाग वस्तीत राहणाऱ्या गरीब मुलांचीही हीच अवस्था आहे. पण अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी भक्कम आधार या मुलांना आता सापडला आहे.

ठळक मुद्देविवंचनेतून भरारी घेतलेल्या उच्चशिक्षितांचा छंद देतोय अनेकांच्या आयुष्याला दिशाविविध सामाजिक उपक्रमातही योगदान

आनंद डेकाटे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : झोपडपट्टी किंवा गरीब वस्त्यातील मुलेही हुशार असतात पण हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे कधी शिक्षणाचा मार्ग थांबतो किंवा सोईसुविधांच्या अभावामुळे तो माघारला जातो. शहरातील रामबाग वस्तीत राहणाऱ्या गरीब मुलांचीही हीच अवस्था आहे. पण अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी भक्कम आधार या मुलांना आता सापडला आहे. हा आधार आहे या वस्तीत शिकविणाऱ्या उच्चशिक्षित तरुणांचा. गुरू आपल्या मार्गातील अडचणी दूर करतो व दिशा दाखवितो. हे तरुणही गरीब मुलांसाठी शिक्षणाच्या मार्गाने लावणारे दिशादर्शक झाले आहेत.सुनील जवादे, धर्मपाल धाबर्डे, राजू गायकवाड, अभिनव मेंढे, शुभम ढेंगरे, प्रशिक वाहाने, ऋषभ जवादे, साहिल धाबर्डे ही आहेत गरीब मुलांच्या गुरुस्थानी असलेले तरुण. रामबागसारख्या गरीब व मागासलेल्या वस्तीत ते वाढले. स्वत:च्या मेहनतीने शिकले. उच्च विद्याविभूषित झाले. एखादा नोकरीवर लागला तर इतर अजूनही शिक्षण घेत नोकरीच्या शोधात आहेत. समोर उज्ज्वल भविष्य असून आपणही समाजाचे काही देणे लागतो, या उद्देशाने या तरुणांनी गरीब विद्यार्थ्यांना शिकवणी देण्याचा निर्णय घेतला. कदाचित याच विवंचना असलेल्या परिस्थितीतूनच ते गेले आहेत. त्यातील राजू गायकवाड हे जीएसटी अधिकारी आहेत. अभिनव मेंढे मेकॅनिकल इंजिनियर, शुभम ढेंगरे हा सुद्धा मेकॅनिकल इंजिनियर आहे. साहिल धाबर्डे व ऋषभ हा डिप्लोमा इन फायर इंजिनियर आहेत. रामबाग परिसरात तथागत बहुउद्देशीय संस्था आहे. संस्थेंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, बुद्ध जयंती आदींसह विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात.२०१५ सालची ही गोष्ट. रामबाग हा परिसर तसा गरीब, कामगार कष्टकऱ्यांचा परिसर. बहुतांश विद्यार्थी हे हुशार परंतु शिकवणी नसल्याने स्पर्धेत माघारतात. परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना काम करावे लागते. त्यामुळे अभ्यासात मागे राहतात. असे अनेक अनुभव या तरुणांनी जवळून पाहिले होते. त्यामुळे किमान आपण चांगले शिकलो तेव्हा इतर गरीब विद्यार्थ्यांंची शिकवणी घ्यायची असा निर्णय या तरुणांनी घेतला. सर्वांना ही कल्पना आवडली. यासाठी एक बॅनर तयार करण्यात आला. तथागत अभ्यासिका असे नाव देण्यात आले. या तरुणांनी संपूर्ण वस्तीत फिरून असे गरजू विद्यार्थी शोधले. त्यांच्या पालकांना सांगितले. तेही तयार झाले.तथागत बहुउद्देशीय संस्थेच्या कार्यालयातच अभ्यासिका सुरू झाली. सुरुवातीला विद्यार्थ्यांची संख्या कमी होती. परंतु हळूहळू ती वाढली. परिसरातील लोकांचाही विश्वास वाढला. आज ५ वी पासून १२ वीपर्यंतचे अनेक गरीब विद्यार्थी येथे शिकवणीसाठी येतात. अभिनव, साहिल, शुभम आणि ऋषभ हे १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांचे विशेष वर्ग घेतात. याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. गेल्या वर्षी दहावीत अनेक विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. या ध्येयशील तरुणांच्या प्रयत्नांनी विद्यार्थ्यांनाही शिकण्याची एक ओढ लागली असून अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षेत चांगले यश प्राप्त केले आहे. चांगल्या विचारांनी, संस्काराने समाज घडविणारे गुरुच तर असतात. हे उच्चशिक्षित तरुण त्यापेक्षा काही वेगळे नव्हेत.

शिकवणीमुळे लागली शाळेची ओढया तरुणांनी सुरू केलेला हा एक छोटाचा प्रयत्न आहे. यातून दहावी-बारावीमध्ये विद्यार्थी एकदम चांगले गुण मिळवू लागले असेही नाही. परंतु या लहानशा पुढाकाराने एक खूप मोठे काम झाले आहे. कदाचित ही मुले शिक्षण सोडून वेगळ्या मार्गाला लागली असती. पण तरुणांच्या शिकवणीमुळे अनेक विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा शाळेची ओढ लागली. ते शाळेत जाऊ लागले. नियमित अभ्यास करू लागले. शिकून जीवनात काहीतरी बनू असे स्वप्न पाहू लागले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रGuru Purnimaगुरु पौर्णिमा