शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

गुनगुना रे, गुनगुना रे, गाना रे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 20:07 IST

श्रेया घोषाल व सुनिधी चौहान या आजच्या पिढीतील आघाडीच्या गायिका. आपल्या स्वरांच्या गोडव्याने विविधरंगी गीतांमधून त्यांनी तरुण रसिकांना आनंद दिला आहे. या दोन्ही लोकप्रिय गायिकांच्या मूळ स्वरातील गाजलेल्या गीतांचा नजराणा रसिकांसाठी सादर करण्यात आला. कनक सूर मंदिरतर्फे साई सभागृह येथे आयोजित विशेष कार्यक्रमातून रसिकांना गुणगुणत राहाव्या अशा तारुण्यमय गीतांचा निखळ आनंद मिळाला.

ठळक मुद्देश्रेया घोषाल व सुनिधी चौहान यांच्या गीतांचा नजराणा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : श्रेया घोषाल व सुनिधी चौहान या आजच्या पिढीतील आघाडीच्या गायिका. आपल्या स्वरांच्या गोडव्याने विविधरंगी गीतांमधून त्यांनी तरुण रसिकांना आनंद दिला आहे. या दोन्ही लोकप्रिय गायिकांच्या मूळ स्वरातील गाजलेल्या गीतांचा नजराणा रसिकांसाठी सादर करण्यात आला. कनक सूर मंदिरतर्फे साई सभागृह येथे आयोजित विशेष कार्यक्रमातून रसिकांना गुणगुणत राहाव्या अशा तारुण्यमय गीतांचा निखळ आनंद मिळाला.गायिका कनका गडकरी यांची संकल्पना आणि मार्गदर्शन या कार्यक्रमात होते. त्यांच्यासह नवोदित गायिकांनी लोकप्रिय गीते समरसतेने सादर केली. या सादरीकरणासह मूळ गीतांच्या व्हिडीओमुळे दृकश्राव्य आनंद उपस्थित श्रोत्यांनी घेतला. काळाच्या ओघात कायम अमिट ठरणाऱ्या अलीकडच्या संगीतकार ए.आर. रेहमान, अजय-अतुल यांच्यासह निर्माते संजय लीला भन्साळी यांच्या प्रतिभेतून निर्माण झालेली ही गीते कलावंतांनी सादर केली. सर्व गायिकांच्या सामूहिक स्वरातून सादरीत सदा संजीवक  राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कनकाच्या गोड स्वरातील ‘ऐ वतन मेरे आबाद रहे...’ या गीताने कार्यक्रम सुरू केला. त्यांच्यासह प्रेरणा सोनी, नंदिता सोहनी, गौरी दामले, साक्षी डोरा, वसुंधरा किरणे, निधी पैठणकर, मीनल कुळकर्णी, अश्लेषा भिडे, उदिता मोहिते, पल्लवी ढोके, रेणुका नेवारे, रश्मी निलावार, अवंती चाफेकर या सहभागी गायिकांनी सुमधूर गाण्यांची मेजवानी श्रोत्यांना दिली.‘मोहे रंग दो नंद के लाल..., बरसो रे मेघा मेघा..., डोला रे डोला..., गुनगुना रे गुनगुना रे गाना रे..., घुमर..., उडी मै ख्वाबो से जुडी..., जिंदगी कैसी पहेली..., पिंगा ग बाई पिंगा..., ये दिवानी मस्तानी हो गयी..., इश्क सुफियाना..., पल पल पल हर पल...’ अशी कानामनात रुंजी घालणारी काही निवडक गाणी कलावंतांनी अदाकारीने सादर केली. विविध चित्रपटांमधील ही गाणी सहवादक कलावंतांच्या सोबतीने अधिक मनमुराद ठरली. निवेदन नम्रता अग्निहोत्री यांनी केले. यावेळी माजी महापौर कुंदाताई विजयकर, ईश्वरी व दत्ता हरकरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. रसिकांनीही मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली.

टॅग्स :musicसंगीतnagpurनागपूर