शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील विद्यापीठांचे ‘रँकिंग’ वाढविण्यासाठी ‘कन्सलटन्सी’चे मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 23:32 IST

‘एनआयआरएफ’मध्ये (नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क) महाराष्ट्रातील विद्यापीठांचे देशातील स्थान हा एक चिंतेचा विषय आहे. राज्यातील विद्यापीठांचे ‘रँकिंग’ वाढावे यासाठी राज्य शासनाने एक वेगळाच मार्ग अवलंबला आहे. एका खासगी ै‘कन्सलटन्सी’सोबत विविध विद्यापीठांना सामंजस्य करार करण्याचे शासनाने निर्देश दिले आहेत. या ‘कन्सलटन्सी’च्या मार्गदर्शनात विद्यापीठांना ‘रँकिंग’ वाढविण्याचे प्रयत्न करायचे आहेत. मात्र खरोखरच एखाद्या ‘कन्सलटन्सी’सोबत करार वाढल्याने विद्यापीठांचा दर्जा वाढणार आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देशासनाच्या निर्देशांनुसार खासगी कंपनीशी करार : खरोखरच दर्जा वाढणार का ?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘एनआयआरएफ’मध्ये (नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क) महाराष्ट्रातीलविद्यापीठांचे देशातील स्थान हा एक चिंतेचा विषय आहे. राज्यातील विद्यापीठांचे ‘रँकिंग’ वाढावे यासाठी राज्य शासनाने एक वेगळाच मार्ग अवलंबला आहे. एका खासगी ‘कन्सलटन्सी’सोबत विविध विद्यापीठांना सामंजस्य करार करण्याचे शासनाने निर्देश दिले आहेत. या ‘कन्सलटन्सी’च्या मार्गदर्शनात विद्यापीठांना ‘रँकिंग’ वाढविण्याचे प्रयत्न करायचे आहेत. मात्र खरोखरच एखाद्या ‘कन्सलटन्सी’सोबत करार वाढल्याने विद्यापीठांचा दर्जा वाढणार आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.२०१६ सालच्या ‘एनआयआरएफ’च्या पहिल्या १०० ‘रँकिंग’मध्ये महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांचा समावेश होता. तर २०१७ व २०१८ मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वगळता एकाही सार्वजनिक विद्यापीठाचा पहिल्या शंभर विद्यापीठांमध्ये समावेश नव्हता.राज्यातील विद्यापीठांचे ‘रँकिंग’ वाढावे यासाठी राज्य शासनाने ‘आय केअर’ या एका खासगी ‘कन्सलटन्सी’ला नियुक्त केले आहे. राज्यातील सर्व अकृषी सार्वजनिक विद्यापीठे व १०० महाविद्यालयांसमवेत या ‘कन्सलटन्सी’चा सामंजस्य करार करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. त्यानुसार विविध विद्यापीठांना संबंधित प्राधिकरणांमध्ये मान्यता घेण्यास सांगण्यात आले होते.यानुसार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची सोमवारी व्यवस्थापन परिषदेची तातडीची बैठक बोलविण्यात आली. यात हा प्रस्ताव ठेवण्यात आला व सामंजस्य करार करण्याच्या मुद्द्याला मंजुरी देण्यात आली, अशी माहिती कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली.खरोखर किती फायदा होणार ?या ‘कन्सलटन्सी’ने कर्नाटक, तामिळनाडू, राजस्थान येथील विद्यापीठांसाठी काम केले आहे. आता राज्यातील विद्यापीठांचे राष्ट्रीयसोबतच आंतरराष्ट्रीय ‘रँकिंग‘ वाढविण्यासाठी या ‘कन्सलटन्सी’कडून मार्गदर्शन करण्यात येईल, असे नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.नीरज खटी यांनी सांगितले. नागपूर विद्यापीठाशी संलग्नित नऊ महाविद्यालयांचादेखील या ‘कन्सलटन्सी’सोबत करार होणार आहे. मात्र राज्यातील विद्यापीठांचा एकूण पसारा पाहता एखाद्या ‘कन्सलटन्सी’च्या मार्गदर्शनाने खरोखरच काही कालावधीतच बदल होईल का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :universityविद्यापीठMaharashtraमहाराष्ट्र