शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

पाहुणा बनून आला आणि अब्रू लुटून गेला; आईवडिलांना कळलेच नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 08:00 IST

घरी पाहुणा म्हणून आलेल्या नराधमाने रोज रात्री केले तिच्यासोबत अश्लील चाळे..

ठळक मुद्देतहसील ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाहुणा बनून आलेल्या जयपूरच्या एका नातेवाईकाने अल्पवयीन मुलीवर तब्बल पाच दिवस बलात्कार केला. पीडित मुलीने आधी मैत्रिणींना ही माहिती दिली आणि त्यानंतर पालकांनी हिंमत दिल्यामुळे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. तहसील पोलिसांनी याप्रकरणी शिवा रमेशचंद्र शर्मा (वय २७) नामक तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.पीडित मुलगी १७ वर्षांची असून बारावीत शिकते. आरोपी शर्मा राजस्थानमधील जयपूरचा रहिवासी असून, तो २१ जूनला नागपुरात पीडिताच्या घरी आला होता. घर छोटेसे असल्यामुळे तिच्या आईने रात्री त्याला तिच्या शेजारी झोपण्यास सांगितले. त्या रात्री आरोपीने पीडितेसोबत अश्लील चाळे केले. पीडिता जागी झाली असता आरोपीने झोपेचे सोंग घेतले. झोपेत हात लागला, असे समजून ती गप्प राहिली. दुसऱ्या दिवशी रात्री पुन्हा त्याने घरातील मंडळी गाढ झोपेत असताना तिच्यावर अत्याचार केला. तिने ओरडण्याचा प्रयत्न केला असता तिचे तोंड दाबून तिला बदनामीचा धाक दाखवला. त्यामुळे पीडिता गप्प बसली.

दुसऱ्या दिवशी पीडितेने त्याच्याजवळ झोपण्यास नकार देऊन आईला या गैरप्रकाराचे संकेत दिले. मात्र आईने नातेवाईक असल्यामुळे त्याच्याजवळ झोपण्यास काही हरकत नाही, असे सांगून तिला गप्प केले. परिणामी पुढचे पाच दिवस आरोपी तिच्यावर रोज अत्याचार करू लागला. २६ जूनला तो निघून गेला. त्यानंतर हादरलेल्या मुलीने आपल्या मित्र-मैत्रिणींना आपबिती सांगितली. त्याने ओरबडण्याच्या आणि चावल्याच्याही जखमा दाखवल्या. त्यामुळे मित्र-मैत्रिणींनी तिच्या आई-वडिलांना ही बाब सांगितली. आई-वडिलांनी बराच विचार केल्यानंतर तिला तहसील ठाण्यात नेले. त्यावरून शनिवारी रात्री याप्रकरणी आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस पथक जयपूरला जाणारआरोपी शर्मा हा विवाहित असून त्याला दोन मुले असल्याची माहिती आहे. त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी तहसील पोलिसांचे पथक लवकरच जयपूरला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

टॅग्स :MolestationविनयभंगCrime Newsगुन्हेगारी