उपराजधानीत नागरिकांनी उभारली कोरोनामुक्तीची गुढी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 12:20 PM2020-03-25T12:20:53+5:302020-03-25T12:21:38+5:30

नागपुरातील नागरिकांनी कोरोनामुक्तीची गुढी उंचावत आपला आरोग्याचा संकल्प जगासमोर व्यक्त केला आहे.

Gudhi Padwa in Nagpur | उपराजधानीत नागरिकांनी उभारली कोरोनामुक्तीची गुढी

उपराजधानीत नागरिकांनी उभारली कोरोनामुक्तीची गुढी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: एकीकडे कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असल्याच्या बातम्या तर दुसरीकडे कोरोनाबाधितांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याची सुवार्ता अशा संभ्रम उत्पन्न करणाऱ्या स्थितीत नागपुरातील नागरिकांनी कोरोनामुक्तीची गुढी उंचावत आपला आरोग्याचा संकल्प जगासमोर व्यक्त केला आहे.
गुढीपाडव्याच्या दिवसाचा उत्साह बाजारपेठा व वाहतूक बंद असली तरी नागरिकांनी घरातच साफसफाई करून व गुढी उभारून द्विगुणित केला आहे.
रस्त्यांवर पोलिस बंदोबस्त चोख आहे तर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडलेली आहेत. दुकानांबाबत दिलेल्या सुरक्षित अंतराच्या निर्देशाचे पालन नागरिक व दुकानदारांकडून केले जात आहे. वैद्यकीय व अन्य सोयीही सुरू आहेत.
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बुधवारी सकाळी शहरात फेरफटका मारून परिस्थितीचा आढावा घेतला. एका किराणा दुकानात नागरिकांनी गर्दी केल्याचे लक्षात येताच त्यांनी, सर्वांना रांगेत उभे राहण्यास फर्मावले.

Web Title: Gudhi Padwa in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.