शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या धर्तीवर पालकमंत्री जनस्वास्थ्य योजना : नितीन राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 20:20 IST

मुख्यमंत्री स्वास्थ्य योजनेच्या धर्तीवर आता नागपुरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल गरजू रुग्णांना तातडीची आर्थिक मदत व औषधोपचार, शस्त्रक्रिया आदी सुविधा मिळावी यासाठी पालकमंत्री जनस्वास्थ्य योजना राबवण्यात येईल, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देशाळा व विद्यार्थ्यांच्या विकासावर भर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुख्यमंत्री स्वास्थ्य योजनेच्या धर्तीवर आता नागपुरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल गरजू रुग्णांना तातडीची आर्थिक मदत व औषधोपचार, शस्त्रक्रिया आदी सुविधा मिळावी यासाठी पालकमंत्री जनस्वास्थ्य योजना राबवण्यात येईल, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत उपरोक्त निर्णय घेण्यात आला. डीपीसीच्या माध्यमातून ही योजन राबवली जाणार आहे. यासोबतच अनेक नागपूर स्तरावर अनेक योजनाही जाहीर करण्यात आल्या असून बैठकीनंतर आयोजित पत्रपरिषदेत पालकमंत्री राऊत यांनी याबाबतची माहिती दिली. पालकमंत्री राऊत यांनी सांगितले की, जनस्वास्थ योजनेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष स्थापन केला जाईल. यासोबतच गरीब गरजू कुटुंबासाठी पालकमंत्री दुग्ध विकास योजना, बुद्धिमत्ता व क्षमता असूनही पैशाअभावी शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण आणि परीक्षा देण्यासाठी तातडीची मदत व्हावी यासाठी पालकमंत्री विद्यार्थी साहाय्यता निधी योजना, पालकमंत्री शाळा सक्षमीकरण योजना, पालकमंत्री हरित शहर व जलसंचय योजना, पालकमंत्री अध्ययन कक्ष सक्षमीकरण योजना जाहीर करण्यात आली.आयएएस कोचिंगसाठी घेणार एनएडीटीची मदतनागपुरात भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र आहे. याची सुधारणा व बळकटीकरण करण्याची घोषणा पालकमंत्री राऊत यांनी केली. याअंतर्गत विद्यार्थ्यांना सुविधा निर्माण करण्यात येईल. प्रशिक्षणाची मुदत १ वर्षावरून दोन वर्षे केली जाईल. या सेंटरसाठी असलेल्या वसतिगृहाची क्षमता १०० वरून २०० पर्यंत वाढवली जाईल. तसेच चांगले प्रशिक्षण मिळावे म्हणून नागपुरातीलच राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी (एनएडीटी)मध्ये प्रशिक्षण देणाºया प्रशिक्षकांची मदत घेतली जाईल, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.पालकमंत्री सुसाटपालकमंत्री म्हणून नितीन राऊत यांची ही पहिलीच डीपीसीची बैठक होती. परंतु या पहिल्याच बैठकीत राऊत यांनी पालकमंत्र्यांच्या नावावर तब्बल सात नवीन योजना जाहीर करून नागपूरच्या विकासाचा अ‍ॅक्शन प्लॅन कसा राहील याची झलक दाखवून दिली. एकूणच त्यांनी आपल्या कामाची शैली व गती कशी राहील, याचेच चित्र दाखवून दिल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Nitin Rautनितीन राऊतguardian ministerपालक मंत्रीHealthआरोग्यMediaमाध्यमे