शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी उपायुक्तांना लाच घेताना अटक; नागपूर सीबीआय, एसीबीची अमरावतीत कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 13:05 IST

कराचा (जीएसटी) भुर्दंड चुकविण्यासाठी एका व्यक्तीला दीड लाखांची लाच मागणारे अमरावती येथील केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे (नवीन केंद्रीय जीएसटी कार्यालय) उपायुक्त मुकुल विश्वास तेलगोटे यांना गुरुवारी रंगेहात पकडण्यात आले.

ठळक मुद्देदीड लाख स्वीकारले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कराचा (जीएसटी) भुर्दंड चुकविण्यासाठी एका व्यक्तीला दीड लाखांची लाच मागणारे अमरावती येथील केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे (नवीन केंद्रीय जीएसटी कार्यालय) उपायुक्त मुकुल विश्वास तेलगोटे यांना गुरुवारी रात्री रंगेहात पकडण्यात आले. सीबीआयच्या नागपूर युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी अमरावती शहरात ही कारवाई केली. मात्र, संपर्क करूनही उशिरापर्यंत याबाबत स्थानिक अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.सूत्रांच्या माहितीनुसार, नवसारीस्थित केंद्रीय उत्पादन शुल्क कार्यालयातील उपायुक्त (आयआरएस) मुकुल तेलगोटे यांनी अमरावतीत खासगी शिकवणी वर्ग चालविणाऱ्या संचालकांना जीएसटीबाबत विचारणा केली होती. ते कर भरण्याचे टाळत असल्याचे ध्यानात आल्यामुळे त्यांनी एकाला कर कमी करण्याच्या बदल्यात दीड लाखाची लाच मागितल्याचा आरोप आहे. संबंधित व्यक्तीने त्याची तक्रार अमरावती एसीबीच्या युनिटकडे केली होती. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर ते केंद्रीय स्तरावरील अधिकारी असल्याने त्याची माहिती नागपूर सीबीआयला देण्यात आली. गुरुवारी नागपूर सीबीआय युनिटने अमरावतीत सापळा रचून मुकुल तेलगोटेंना दीड लाखाची लाच घेताना रंगेहात पकडले. त्याची माहिती अमरावती, नागपूरच नव्हे तर सर्वत्र  वेगाने पसरली. त्यामुळे जीएसटी कार्यालय व व्यापारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. या संबंधाने अधिक माहिती मिळवण्यासाठी सीबीआयच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी सध्या कारवाई सुरू आहे. पूर्ण चौकशी झाल्याशिवाय माहिती देणे योग्य नसल्याचे म्हटले. सूत्रांच्या माहितीनुसार, अमरावतीच्या गौरी इन हॉटेलमध्ये तेलगोटेसह प्रकरणाशी संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू होती.

 

टॅग्स :Crimeगुन्हा