शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जीएसच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 01:11 IST

जीएस कॉलेजचा बारावीचा विद्यार्थी राहुल तिवारी (वय १६) याच्या मृत्यूप्रकरणात सीताबर्डी पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी एका अल्पवयीन विद्यार्थ्यावर राहुलच्या मृत्यूला कारणीभूत असल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देआरोपी अल्पवयीन विद्यार्थी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जीएस कॉलेजचा बारावीचा विद्यार्थी राहुल तिवारी (वय १६) याच्या मृत्यूप्रकरणात सीताबर्डी पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी एका अल्पवयीन विद्यार्थ्यावर राहुलच्या मृत्यूला कारणीभूत असल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला.२ आॅगस्टच्या दुपारी कॉलेजच्या परिसरात राहुलचा मृत्यू झाला होता. दोषी विद्यार्थी (वय १६) राहुलसोबतच शिकायचा. त्यांच्यात दुपारी वाद झाला. राहुलकडून मारहाण झाल्याने दोषी विद्यार्थ्याने एक थापड मारून राहुलला जोराचा धक्का मारल्याने तो खाली पडला आणि गतप्राण झाला. कॉलेज प्रशासनाने ही गंभीर बाब प्रारंभी लपवून ठेवल्याचा आरोप आहे. ३ आॅगस्टला त्याची माहिती झाल्याने संतप्त तिवारी परिवार आणि स्वकीयांनी कॉलेजमध्ये जाऊन आपला रोष निर्माण केला. त्यानंतर सीताबर्डी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. चौकशीत राहुल आणि दोषी विद्यार्थ्यामध्ये वाद झाल्याचे स्पष्ट झाले. राहुलने मारल्यामुळे दोषी विद्यार्थ्यानेही त्याला एक थापड मारून जोराचा धक्का दिला. त्यामुळे खाली पडून जबर दुखापत झाल्याने राहुलचा मृत्यू झाला. हा प्रकार उघड झाल्यानंतर ठाणेदार हेमंतकुमार खराबे यांनी आपल्या सहकाऱ्यांकडून या प्रकरणात मंगळवारी सायंकाळी दोषी विद्यार्थ्याविरुद्ध कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल करून घेतला. दोषी विद्यार्थी अल्पवयीन असल्यामुळे त्याला अटक करता येत नाही. मात्र, त्याला ताब्यात घेऊन त्याची सुधारगृहात रवानगी केली जाणार आहे.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीMurderखून