शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
3
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
4
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
5
'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
6
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
7
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
8
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
9
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
10
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
11
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
12
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
13
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
14
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
15
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
16
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
17
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
18
वेसावकरांनी भाल्याने फोडली हंडी; डोंगरीकर तरुण मंडळाला ९ वर्षांनी मिळाला मान
19
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
20
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!

ऑनलाईन अभ्यासक्रमाला वाढतोय प्रतिसाद! दीक्षा अ‍ॅपच्या माध्यमातून शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 09:56 IST

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी दीक्षा अ‍ॅपच्या माध्यमातून अभ्यासमाला सुरू केली आहे. नागपुरात ९९,२४८ विद्यार्थ्यांनी दीक्षा अ‍ॅपच्या माध्यमातून अभ्यासाला सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देनागपुरात ९९ हजार विद्यार्थी हाताळताहेत दीक्षा अ‍ॅप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमुळे शाळेला सुट्या लागल्या आहेत. वर्ग १ ते ९ पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षाही रद्द करून पुढच्या वर्गात विद्यार्थ्यांना प्रविष्ट केले आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांना घराबाहेर पडता येत नाही, अशात घरी बसून विद्यार्थ्यांचा वेळ अभ्यासात जावा म्हणून महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी दीक्षा अ‍ॅपच्या माध्यमातून अभ्यासमाला सुरू केली आहे. नागपुरात ९९,२४८ विद्यार्थ्यांनी दीक्षा अ‍ॅपच्या माध्यमातून अभ्यासाला सुरुवात केली आहे.दीक्षा अ‍ॅपचा वापर करण्यास विभागात नागपूर अव्वल स्थानी आहे. त्यानंतर भंडारा जिल्ह्याचा समावेश आहे. भंडारा जिल्ह्यात ५५,०२९ युझर दीक्षा अ‍ॅपद्वारे अभ्यास करीत आहेत. दीक्षा अ‍ॅपमध्ये विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी स्वतंत्र लॉगईन असल्याने विद्यार्थ्यांनी काय करावे, शिक्षकांनी कसे शिकवावे या सूचना दिल्या आहेत. शिक्षण विभागाच्या पुढाकारामुळे सर्व भाषेतील व माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तकावर आधारित ऑनलाईन अभ्यासमालेचा यात समावेश आहे. कोरोनामुळे शाळा बंद असल्यातरी विद्यार्थ्यांना एनसीआरटीईच्या दीक्षा अ‍ॅपच्या माध्यमातून ऑलनाईन पद्धतीने दररोज शालेय अभ्यासकम शिकविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.कोरोनामुळे राज्यात १६ मार्चपासून शाळा बंद करण्यात आला. तेव्हापासून सुरू झालेल्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा आता पूर्ण होत आहे. परंतु कोरोना पॉझिटिव्हची राज्यात वाढत असलेली संख्या लक्षात घेता, राज्य सरकारला चौथ्यांदा लॉकडाऊन करणे भाग पडणार आहे. त्यामुळे २०२०-२१ या वर्षात शाळेचे सत्र कधी सुरू होते, याचा नेम नाही. अशात शिक्षण विभाग दीक्षा अ‍ॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा अभ्यास करवून घेत आहे.- शिक्षण विभागाला दिली जबाबदारीजिल्ह्यात इयत्तानिहाय विद्यार्थ्यांचे, पालकांचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करून त्यांच्यापर्यंत दीक्षा अ‍ॅप पोहचविण्याची जबाबदारी शिक्षणाधिकारी, गटशिक्षण अधिकारी व केंद्रप्रमुखांना दिली आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सूचना दिल्या आहे. त्याचा परिणाम म्हणून नागपूर जिल्ह्यात दीक्षा अ‍ॅपचे ९९ हजारांवर युझर झाले आहेत.- दीक्षा अ‍ॅपची वैशिष्ट्येवर्ग १ ते ९ पर्यंतच्या सर्व विषयांच्या सर्व धड्यांचा अ‍ॅपमध्ये समावेशपाठ्यपुस्तक, व्हिडिओचा समावेशएनसीआरटीई द्वारे रोज एका विषयाची अभ्यासमालिकासर्व माध्यमांसाठी अ‍ॅपचा वापर शक्य- नागपूर विभागात अ‍ॅप युझरनागपूर - ९९,२८४भंडारा - ५५,०२९चंद्रपूर - २२,६०५गडचिरोली - १३,९६४वर्धा - १४,०११गोंदिया - ६,९८७

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र