शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन

By admin | Updated: November 30, 2015 02:43 IST

थोर समाज सुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या १२५ व्या पुण्यतिथीनिमित्त शहरातील विविध शासकीय व अशासकीय संघटनांच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करून महात्मा फुले ...

विविध संस्था, संघटनांच्या वतीने कार्यक्रमांचे आयोजननागपूर : थोर समाज सुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या १२५ व्या पुण्यतिथीनिमित्त शहरातील विविध शासकीय व अशासकीय संघटनांच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करून महात्मा फुले यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.डिस्ट्रीक्ट बार असोसिएशनजिल्हा वकील संघटनेच्यावतीने सत्यशोधक समाजाची स्थापना करणारे महात्मा जोतिबा फुले यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश जायस्वाल व सरकारी वकील विजय कोल्हे यांच्या हस्ते माल्यार्पण करून महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अ‍ॅड. प्रशांत साथीयानाथन, अ‍ॅड. दीपक कोल्हे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाला संघटनेचे सचिव अ‍ॅड. नितीन तेलगोटे, उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत भांडेकर, अ‍ॅड. अक्षय समर्थ, अ‍ॅड. नीलेश गायधने, अ‍ॅड. श्रीकांत गौळकर, अ‍ॅड. नचिकेत व्यास, ग्रंथालय प्रभारी अ‍ॅड. गिरीश खोरगडे, अ‍ॅड. नितीन गडपाले, परिक्षित मोहिते, उज्ज्वल फसाटे आदी उपस्थित होते.नॅशनल पीपल्स सोशल आॅर्गनायझेशननॅशनल पीपल्स सोशल आॅर्गनायझेशन या सामाजिक संघटनेच्यावतीने थोर समाज सुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त कॉटन मार्केट येथील महात्मा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजेश ढेंगरे, नगरसेविका सुजाता कोंबाडे, डॉ. दिलीप सुखदेवे, गौतम ढेंगरे, डॉ. विठ्ठलराव कोंबाडे, डॉ. अनिल हिरेखण, डॉ. राजाभाऊ टांकसाळे, प्रशांत बन्सोड, डॉ. मिलिंद जीवने, दिलीप नानवटे, डॉ.एन.टी. देशमुख,संजय मुन, संघरत्न गाणार, महेंद्र भगत, प्रशांत शिंगणे, कैलास खोंडे, पंकज चवरे, अरुण गाडे, रवी पोथारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.दलित मित्र संघमहाराष्ट्र राज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र संघाच्यावतीने महात्मा जोतिबा फुले यांच्या १२५व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. कॉटन मार्केट येथील महात्मा फुले व सावित्रीआई फुले यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून आदरांजली वाहिण्यात आली. याप्रसंगी सरचिटणीस योगेश वागदे, वामनराव कोंबाळे, भूषण दडवे, रुपराव राऊत, मंदा वैरागडे, मायाताई घोरपडे यांच्यासह मानावाधिकार रक्षा समितीचे दिलीप नानवटे, आशा खोब्रागडे, अन्यायग्रस्त माथाडी कामगार संघटनेचे गजराज कश्यप, तीरथ पटेल, तुलशीराम पटेल, मनोहर राऊत, दिलीप कराडे आदी उपस्थित होते.समाजवादी पार्टीक्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या १२५व्या पुण्यतिथीनिमित्त समाजवादी पार्टीतर्फे पक्ष कार्यालयात कार्यक्रम आयोजित करुन महात्मा फुले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सपाचे शहर अध्यक्ष अफजल फारुक यांनी महात्मा फुले यांचे कार्य पुढे चालविण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. याप्रसंगी शकील अहमद, शेख इकबाल, अनिल मोहबे, आदर्श सिंह ठाकुर, शेख हमीद, शकील सलमानी, गौरव लालवानी, नवेद शेख, रफीक अहमद आदी कार्यकर्ता उपस्थित होते.शकुंतला पब्लिक स्कूलशकुंतला मल्टिपरपज सोसायटीद्वारा संचालित शकुंतला पब्लिक स्कूल व बारक्लोज प्ले हाउस येथे महात्मा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात मुख्याध्यापिका वर्षा शेंडे, संचालक सुनील शेंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन शैलजा यांनी केले. नीता यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.नागपूर शहर काँग्रेस सेवादलनागपूर शहर काँग्रेस सेवादलाच्यावतीने स्त्री शिक्षणाचे प्रणेते, थोर समाज सुधारक महात्मा जोतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सेवादलाचे मुख्य संघटक रामगोविंद खोब्रागडे, यशवंतराव कुंभलकर, सुलभा नागपूरकर, स्मिता कुंभारे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रत्नमाला फोपरे यांनी तर संचालन दत्ता पखान यांनी केले. मच्छिंद्र जिवने यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विजय सव्वालाखे, सतीश तारेकर, सुरेश भोयर, सिद्धार्थ ढोले, अरुण अनासने, शेषराव पापडकर, प्रभुदास तायवाडे, रतनलाल रंगारी आदी कार्यकर्ता उपस्थित होते.महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी महासंघमहात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने महात्मा फुले यांच्या कॉटन मार्केट येथील प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महासंघाचे राज्य अध्यक्ष अरुण गाडे, रवी पोथारे, राजेश ढेंगरे, विनेश शेवाळे, भय्याजी शेलारे, शेषराव हाडके, सुरेंद्र पोथारे, विनोद मेश्राम, राजकुमार रामटेके, रेखा लोखंडे, मीरा सरदार, दीपज्योती वालदे, मीनाक्षी बोरकर, संजय सायरे, अ‍ॅड. हरीदास बोरकर, अनिल हिरेखण, सिद्धार्थ बोरकर, तुलसी मदामे, आदी कार्यकर्ता उपस्थित होते.सर्व मानव सेवा संघसर्व मानव सेवा संघाच्यावतीने महात्मा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष भाजपा शहर उपाध्यक्ष सुभाष कोटेचा यांनी माल्यार्पण करून महात्मा फुले यांना आदरांजली वाहिली. याप्रसंगी महिला आघाडी सहसंयोजिका आशा बोरकर, संघ कार्याध्यक्ष आशिष बाजपेयी, राजेश कुंभारे, सीमा वासनिक, ममता मेंढे, सुजाता मेंढे, सरिता थेर, कल्पना रंगारी, प्रतीक बोरकर, दीक्षा कांबळे, कोविल बोरकर, हर्षल मेश्राम, मेघा शिवणकर, नम्रता ढोके, स्वाती ढोके, दिनेश येवले आदी उपस्थित होते.कास्ट्राईब कर्मचारी महासंघमहात्मा फुले यांच्या १२५ व्या पुण्यतिथीनिमित्त कास्ट्राईब कर्मचारी महासंघांच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील कार्यालयात श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी माल्यार्पण करून महात्मा फुले यांना अभिवादन केले. याप्रसंगी रसायन शास्त्रज्ञ शिवदास वासे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी डॉ.सोहन चवरे, सत्यदेव रामटेके, डॉ.बाळासाहेब बन्सोड, डॉ.सुभाष गायकवाड, बबनराव ढाबरे, पंकज घाटे, परसराम गोंडाने, संदेश आगलावे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमहात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे कॉटन मार्केट येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शहर अध्यक्ष माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार प्रकाश गजभिये, शहर कार्याध्यक्ष प्रवीण कुंटे, अतुल लोंढे, ईश्वर बाळबुधे, वेदप्रकाश आर्य, नुतन रेवतकर, राजू नागुलवार, विनोद हेडाऊ प्रामुख्याने उपस्थित होते. यासह डॉ. वामनराव राऊत, सुखदेव वंजारी, डॉ. प्रशांत बनकर, प्रा.एस.के. सिंह, संजय शेवाळे, विशाल खांडेकर, राजेश माकडे, रिजवान अन्सारी, नरेंद्र पुरी, दिनकर वानखेडे, द्वीप पंचभागे, वर्षा शामकुळे आदी पदाध्रिकारी हजर होते.आलु प्याज फल सब्जी विक्रेता संघभारतीय शिक्षक क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त आलु प्याज फल सब्जी विक्रेता संघ, नागपूर शहर सुधार समिती व विश्व मैत्रेय बुद्धिस्ट संघाच्यावतीने त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी आलु प्याज विक्रेता संघाचे सचिव प्रशांत ढेंगरे, नागपूर सुधार समितीचे अध्यक्ष प्रवीण राऊत व बुद्धिस्ट संघाचे सचिव बंडू बहादुरे यांनी महात्मा फुलेंच्या जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी सोमाजी शंभरकर, प्रकाश बहादुरे, संजय गोस्वामी, इंद्रपाल वाघमारे, राकेश पाटील, सुरेंद्र सम्राट, फरहाज अली, सुजीत बनकर, वर्षा शामकुळे, रुपा बनकर, शकुंतला भोंगाडे, शारदा निखाडे आदी उपस्थित होते.राष्ट्रीय समाज पक्षराष्ट्रीय समाज पक्षाच्या युवा आघाडीच्यावतीने थोर समाज सुधारक जोतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त कॉटन मार्केट येथील पुतळ्याला माल्यार्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष दत्ता मेश्राम, प्रदेश सरचिटणीस मिलिंद खैरकर, राजेंद्र पाटील, मनोज निनावे, अरविंद चिंचखेडे, मनोहर चौधरी, सीमा मेश्राम, कविता खैरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)