शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रीन व्हिजिल बनली अर्थ इको इंटरनॅशनलची ग्लोबल पार्टनर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 01:13 IST

अमेरिकेतील प्रसिद्ध पर्यावरण संस्था अर्थ इको इंटरनॅशनलने नागपूरच्या ग्रीन व्हिजिल या पर्यावरणवादी संस्थेला ग्लोबल पार्टनर बनविले आहे. अर्थ इको इंटरनॅशनलचे सेन रुसेल यांनी संस्थेचे संस्थापक कौस्तुभ चॅटर्जी यांच्याशी ‘ग्लोबल पार्टनरशीप अ‍ॅग्रीमेंट’ वर हस्ताक्षर केले आहे.

ठळक मुद्देभारतातून केवळ एकमेव संस्था : २०१२ पासून करतेय तलावांचे परीक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अमेरिकेतील प्रसिद्ध पर्यावरण संस्था अर्थ इको इंटरनॅशनलने नागपूरच्या ग्रीन व्हिजिल या पर्यावरणवादी संस्थेला ग्लोबल पार्टनर बनविले आहे. अर्थ इको इंटरनॅशनलचे सेन रुसेल यांनी संस्थेचे संस्थापक कौस्तुभ चॅटर्जी यांच्याशी ‘ग्लोबल पार्टनरशीप अ‍ॅग्रीमेंट’ वर हस्ताक्षर केले आहे.अर्थ इको इंटरनॅशनल गेल्या काही वर्षांपासून जगातील नदी व तलावांच्या पाण्याचे परीक्षण व निरीक्षण करते. या निरीक्षणातून ‘वॉटर मॉनेटरींग चॅलेंज इअर बुक’ प्रकाशित करते. यात जगभरातील हजारो संस्था आपल्या शहर व गावातील नदी व तलावांचा डाटा पाठवितात. ग्रीन व्हिजिल सुद्धा २०१२ पासून शहरातील तलावांच्या पाण्याचे परीक्षण करून त्याचा डाटा ‘अर्थ इको इंटरनॅशनल’ ला पाठवित आहे. गेल्या आठ वर्षात ग्रीन व्हिजिलने केलेल्या तलावांच्या पाण्याच्या परीक्षण व विश्लेषणाची प्रशंसा अर्थ इकोने केली आहे. यावर्षी नागपूरच्या ग्रीन व्हिजिलला ग्लोबल पार्टनर बनविले आहे.आतापर्यंत अर्थ इकोने जगभरातील केवळ २८ संस्थांना ग्लोबल पार्टनर बनविले आहे. भारतातून ग्रीन व्हिजिल ही एकमेव संस्था अर्थ इकोशी जुळली आहे. अर्थ इकोने ग्रीन व्हिजिलला कराराच्या प्रमाणपत्राबरोबरच अत्याधुनिक परीक्षण कीट पाठविलेली आहे. ज्याद्वारे उत्तम प्रकारे नद्या व तलावांची चाचणी केली जाईल.ग्रीन व्हिजिल संस्थेचे संस्थापक कौस्तुभ चॅटर्जी यांनी सांगितले की, जगप्रसिद्ध पर्यावरणवादी संस्थेद्वारे ग्लोबल पार्टनर निवडले जाणे ही शहरासाठी गौरवाची बाब आहे.

टॅग्स :Waterपाणीnagpurनागपूर