शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

ग्रीन स्पेस; गरज १२ घनमीटरची, उपलब्ध केवळ २.३२ घनमीटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 08:26 IST

Nagpur news केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी विभाग मंत्रालयाच्या निर्देशांकानुसार शहरात १० ते १२ घनमीटर प्रतिव्यक्ती हिरवळीची जागा (ग्रीन स्पेस) म्हणजे १००० लाेकसंख्येमागे १.२ ते १.४ हेक्टर हिरवळ असणे आवश्यक आहे. मात्र अभ्यासानुसार नागपूर शहरात केवळ २.३२ घनमीटर ग्रीन स्पेस उपलब्ध आहे.

ठळक मुद्देनीरीचा अहवाल५० वॉर्ड ग्रीन झाेन, ४४ ऑरेंज तर १९ रेड झाेनमध्ये 

निशांत वानखेडे

नागपूर : केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी विभाग मंत्रालयाच्या निर्देशांकानुसार शहरात १० ते १२ घनमीटर प्रतिव्यक्ती हिरवळीची जागा (ग्रीन स्पेस) म्हणजे १००० लाेकसंख्येमागे १.२ ते १.४ हेक्टर हिरवळ असणे आवश्यक आहे. मात्र अभ्यासानुसार नागपूर शहरात केवळ २.३२ घनमीटर ग्रीन स्पेस उपलब्ध आहे. परिस्थितीनुसार यामध्ये आणखी घट हाेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था (नीरी) यांच्या २०१९-२० च्या पर्यावरण स्थिती अहवालातून (इएसआर) ही बाब समाेर येत आहे. या अहवालानुसार शहरात पार्क, उद्याने, शहरी जंगल मिळून ६५ सार्वजनिक ग्रीन स्पेसेस आहेत. त्यापैकी बऱ्याच उद्यानांची अवस्था व्यवस्थापनाअभावी वाईट हाेत आहे. ही स्थिती भविष्यात नागरिकांची हिरवळीची गरज परिपूर्ण करू शकणार नाही. सर्वेक्षणानुसार शहरातील ५० वाॅर्ड हिरवळीच्या बाबत ग्रीन झाेनमध्ये आहेत. मात्र ४४ वाॅर्ड ऑरेंज झाेन तर १९ वाॅर्ड रेड झाेन म्हणजे चिंताजनक स्थितीत आहेत.

नीरीचे संचालक डाॅ. राकेश कुमार यांच्या मार्गदर्शनात आणि रिसर्च सेलच्या संचालिका डाॅ. अत्या कपले व वरिष्ठ वैज्ञानिक डाॅ. शालिनी ध्यानी यांच्या नेतृत्वात २०२० च्या सुरुवातीला १०० वाॅडाँमध्ये १०५० कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. शहरात उपलब्ध ग्रीन स्पेसबाबत नागरिक समाधानी आहेत का, याबाबत त्यांचे मत जाणून घेण्यात आले. यामध्ये सर्व वयाेगट, शिक्षण गटातील नागरिकांचा समावेश हाेता.

काेण समाधानी, काेण असमाधानी

- ५१ टक्के मानतात पुरेशी हिरवळ आहे. २२ टक्क्यांना मान्य नाही. २७ टक्क्यां सांगता येत नाही.

- ५० टक्के उद्यान व्यवस्थापनाबाबत समाधानी, ५० टक्के असमाधानी.

- ३४.६ टक्के लाेकांना वाटते वायुप्रदूषण व हीट आयलॅण्ड इफेक्ट कमी करण्यास उपलब्ध हिरवळ पुरेशी नाही. ३४ टक्के म्हणतात पुरेशी आहे.

- ४२ टक्के लाेकांना ५०० मीटरपेक्षा अधिक दूर जावे लागते.

- २८ टक्के नागरिकांसाठी २०० ते ५०० मीटरवर, २०.५ टक्क्यांसाठी ५० ते २०० मीटरवर तर ९ टक्के लाेकांसाठी ५० मीटरपेक्षा कमी अंतरावर.

उद्यानात जाण्याची कारणे काेणती

- ८२ टक्के नागरिक म्हणतात शुद्ध हवेची गरज. ६३ टक्के आराेग्यासाठी, ३३ टक्के मानसिक तणाव घालविण्यासाठी जातात.

- ४४ टक्के दरराेज उद्यानात जातात. ३५ टक्के आठवड्यातून, १५ टक्के महिन्यातून तर ७ टक्के जवळ नसल्याने क्वचितच.

- महामारीच्या काळात हिरवळीकडे जाणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले.

- ७७.५ टक्के सांगतात थेट उपयाेग घेतला नाही. २०.५ टक्के फुले, फळे, पत्ते आदींसाठी, ३८ टक्के इतर उपयाेग, २ टक्के इंधन, १.२ टक्के चारा.

- ७७.५ टक्के नागरिकांनी कधी झाड लावले नाही. २० टक्के म्हणतात कधीकधी लावले.

पेंडामिकमुळे लाेकांमध्ये ग्रीन स्पेसबाबत जागृती वाढत आहे. मात्र हिरवळीमध्ये वाढ करण्याची गरज आहे. ग्रीन झाेनमध्ये असलेले वाॅर्ड ५ वर्षात रेड झाेनमध्ये येऊ नये म्हणून लक्ष देण्याची आणि ऑरेंज व रेड झाेनमध्ये सुधारणांसाठी उपाययाेजना करण्याची गरज आहे. भविष्यात हिरवळीच्या जागांची प्रचंड गरज वाढणार आहे. त्यामुळे प्राधान्यक्रमाने वाॅर्डनिहाय ॲक्शन प्लॅन तयार करण्याची गरज आहे.

- डाॅ. अत्या कपले, संचालिका, रिसर्च सेल, नीरी.

टॅग्स :environmentपर्यावरण