शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफल करा मस्तीने... : हौशी कलावंतांची धम्माल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 00:03 IST

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहून काम, घर आणि सर्व नातीगोती सांभाळून संगीत क्षेत्रातील अमूल्य असा ठेवा जोपासलेले संगीत कुटुंब म्हणजे कुटुंब ‘स्वरोस्तुते’. या कुटुंबातील हौशी गायकांनी हिंदी-मराठी गीतांच्या मस्तीभऱ्या सादरीकरणाने धम्माल मनोरंजन केले. व्यावसायिक गायक नसूनही त्यांचे मनमुराद गायन श्रोत्यांना आनंद देऊन गेले.

ठळक मुद्देकुटुंब स्वरोस्तुतेचे मस्तीभरे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहून काम, घर आणि सर्व नातीगोती सांभाळून संगीत क्षेत्रातील अमूल्य असा ठेवा जोपासलेले संगीत कुटुंब म्हणजे कुटुंब ‘स्वरोस्तुते’. या कुटुंबातील हौशी गायकांनी हिंदी-मराठी गीतांच्या मस्तीभऱ्या सादरीकरणाने धम्माल मनोरंजन केले. व्यावसायिक गायक नसूनही त्यांचे मनमुराद गायन श्रोत्यांना आनंद देऊन गेले.महाराष्ट्रात वेगळी ओळख निर्माण करणाºया या कलावंतांनी विदर्भकर संगीतप्रेमींसाठी खास संगीतमय मेजवानी दिली. गणेशकुमार निकम आणि कामिनी भागवते यांची संकल्पना असलेला हा कार्यक्रम शनिवारी हिंदी मोरभवनच्या अर्पण सभागृहात सादर करण्यात आला. कल्पना भंगाळे या निवेदनासह गायन तसेच नूतन भेलकर, सुमित्रा ठाकरे, संजय पळसोडकर, जय टंडन, अविनाश मारबते, तेजस आठवले, चेतन वानखेडे, सचिन पतरंगे, राहुल निकम या गायक कलावंतांनी कार्यक्रमात वेगळीच रंगत भरली. कल्पना, कामिनी, चेतन आणि संजय यांनी संयुक्तपणे सादरीत ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे...’ या मराठी भावगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पुढे ‘दिल तो है दिल..., फुलों के रंग से..., तेरे चेहरे मे ओ जादू..., छु कर मेरे मनको..., दिल ने कहा..., दिल मे हो तुम..., बेपनाह प्यार है आजा..., तेरे दर पर सनम चले आये..., प्यार थोडा प्यार..., मेघा रे मेघा रे..., वादा करो नही छोडेंगे..., यू आर माय सोनिया..., प्यार मे दिल पे मार दे गोली..., प्यार बिना चैन कहां रे...’ असे वेगवेगळ्या ढंगातील नवे-जुने गाणे सादर केले. यासह ‘हिरवा निसर्ग हा भवतीने..., राधा ही बावरी..., रूपेरी वाळूत..., मला वेड लागले प्रेमाचे..., चोरीचा मामला...’ अशी मराठी गीते सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. याशिवाय महिला कलावंतांनी गायिका आशा भोसले यांच्या ‘ये मेरा दिल प्यार का दिवाना..., दम मारो दम...’ अशी वेगवान कॅब्रे गाऊन टाळ्यांचा प्रतिसाद मिळवला. पुरुष गायकांनीही आर.डी. बर्मन व बप्पी लाहिरी यांची वेगवान गीते गात कार्यक्रम रंगतदार बनविला. श्रोत्यांनी या संगीत मेजवानीचा मनमुराद आनंद घेतला.

टॅग्स :musicसंगीतnagpurनागपूर