शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी ग्रामस्तरावर ग्रीन जीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 20:36 IST

ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेता यावा यासाठी खेळाचे मैदान असलेल्या ग्रामपंचायतीला सात लाख खर्चापर्यंत ग्रीन जीम देऊन क्रीडांगण विकासालाही निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

ठळक मुद्देराष्ट्रीय युवा दिन : क्रीडा साहित्य व निधीचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेता यावा यासाठी खेळाचे मैदान असलेल्या ग्रामपंचायतीला सात लाख खर्चापर्यंत ग्रीन जीम देऊन क्रीडांगण विकासालाही निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.विभागीय क्रीडा संकुल येथे राष्ट्रीय युवा दिन तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त खेळाडूंना क्रीडा साहित्यांचे वाटप तसेच क्रीडांगण विकास निधीचे वाटप पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य व्हॉलिबॉल संघटनेचे विजय डांगरे, महानगरपालिकेच्या क्रीडा समितीचे सभापती नागेश शहारे, नगरसेविका आभा पांडे, संध्या इंगळे, अविनाश दोसटवार, सचिन सुरेश घोडे, शिक्षणाधिकारी शिवलिंग पटवे, क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश फुंड उपस्थित होते.ग्रामीण भागात खेळाडूंना व्यायामासह विविध खेळामध्ये सहभाग घेता यावा यासाठी जिल्हा वार्षिक योजनेमधून क्रीडांगण विकास अनुदानअंतर्गत क्रीडांगणाची सुधारणा, संरक्षित भिंत बांधणे, तसेच २०० मीटरचा धाव मार्ग तयार करणे आणि आवश्यक सुविधांसाठी प्रत्येकी सात लक्ष रुपये अनुदान स्वरुपात देण्यात येते असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी ग्र्रामीण भागातील १६० ग्रामपंचायतींना प्रत्येकी सात लक्ष रुपयाप्रमाणे क्रीडांगण विकासासाठी निधी देण्यात आला असून १०३ व्यायमशाळांनासुध्दा आवश्यक खेळाचे साहित्य खरेदी करण्यासाठी निधीचे धनादेश देण्यात आले.हर्षल झाडे यांना सर्वोत्कृष्ट रायफलचे वितरणजिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत नामवंत खेळाडू हर्षल झाडे यांना जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या वतीने आंतरराष्ट्रीय दर्जाची सर्वोत्कृष्ट रायफल पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आली. तसेच दोन लक्ष रुपयाचे बॉक्सिंग या खेळाचे साहित्य पकंज नलेंद्रवार यांना देण्यात आले. व्यायमशाळा विकास अनुदान योजनेअंतर्गत व्यायामशाळेचे बांधकाम व व्यायामशाळा साहित्य खरेदीसाठी प्रत्येकी सात लक्ष रुपयाच्या अनुदानाचे धनादेश यावेळी वितरित करण्यात आले.

टॅग्स :Sportsक्रीडाnagpurनागपूर