शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील १००० खाटांच्या जम्बो कोविड सेंटरला हिरवी झेंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 13:49 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारची कानउघाडणी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नागपुरातील १००० खाटांच्या जम्बो कोविड सेंटरला हिरवी झेंडी दाखवण्यात आली.

ठळक मुद्देसरकारचा आदेश जारीविभागीय क्रीडासंकुलात उभारली जाईल व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारची कानउघाडणी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नागपुरातील १००० खाटांच्या जम्बो कोविड सेंटरला हिरवी झेंडी दाखवण्यात आली. हे सेंटर मानकापूरस्थित विभागीय क्रीडासंकुलातील इनडोअर स्टेडियम येथे उभारले जाणार आहे. १००० खाटांपैकी ४०० खाटा व्हेंटिलेटरच्या तर, ३०० खाटा ऑक्सिजनच्या राहणार आहेत.यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर यांनी १६ सप्टेंबर रोजी आदेश जारी केला. नागपूर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्ण सतत वाढत असल्यामुळे त्यांना सध्या उपलब्ध असलेल्या वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत आहेत. परिणामी, हे जम्बो कोविड सेंटर उभारण्यासाठी महानगरपालिका आयुक्तांनी गेल्या १९ ऑगस्ट रोजी राज्य सरकारला प्रस्ताव सादर केला होता. परंतु, राज्य सरकारने त्याची तातडीने दखल घेतली नाही. ही बाब १५ सप्टेंबर रोजी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यानंतर उच्च न्यायालयाने राज्य सरकारची कानउघाडणी करून मनपाच्या प्रस्तावावर एक आठवड्यात निर्णय घेण्याचे निर्देश दिले. तसेच, आदेशाचे उल्लंघन झाल्यास राज्याच्या मुख्य सचिवांनी न्यायालयात स्वत: उपस्थित राहून स्पष्टीकरण सादर करावे, अशी तंबी दिली. सरकारला हा दणका बसल्यानंतर राज्य कार्यकारी समितीने खडबडून जागे होत जम्बो कोविड सेंटरला तत्त्वत: मंजुरी प्रदान केली.असे राहील निधीचे विभाजनमहानगरपालिका : २५ टक्केराज्य सरकार : २५ टक्केनागपूर सुधार प्रन्यास व नागपूर प्रदेश महानगर विकास प्राधिकरण : २५ टक्केजिल्हा नियोजन योजना व खासगी कंपन्यांचा सामाजिक दायित्व निधी : २५ टक्केआराखडा सादर करण्याचे निर्देशयासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने सरकारचा आदेश रेकॉर्डवर घेऊन जम्बो कोविड सेंटरचा विस्तृत आराखडा दोन आठवड्यात सादर करण्यात यावा असे निर्देश महानगरपालिका आयुक्तांना दिले. तसेच, हा आराखडा न्यायालयात सादर करण्यापूर्वीही त्यावर कार्यवाही करता येईल असे स्पष्ट केले. विभागीय आयुक्त व महानगरपालिका आयुक्तांनी यासंदर्भात तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याची न्यायालयाला ग्वाही दिली.सेंटरची जबाबदारी मनपा आयुक्तांवरजम्बो कोविड सेंटर सुरळीत कार्यरत ठेवण्याची जबाबदारी महानगरपालिका आयुक्तांची राहील असे सरकारच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, या सेंटरच्या संनियंत्रणासाठी विभागीय आयुक्तांच्या अधिपत्याखालील एक अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी असे निर्देश देण्यात आले आहेत. जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यापूर्वी त्यासाठी लागणारे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व इतर मनुष्यबळ उपलब्ध ठेवावे असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.असे होते न्यायालयाचे ताशेरेकोरोना संक्रमणामुळे नागपुरातील परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे. मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. शवागारे फुल्ल झाली आहेत व स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारांसाठी रांग लागत आहे. असे असतानाही कोरोना रुग्णांना व्हेंटिलेटर व ऑक्सिजनपासून वंचित राहावे लागत आहे. तसेच, राज्य सरकार यासंदर्भात ठोस उपाययोजना करण्यास तयार नाही, असे ताशेरे उच्च न्यायालयाने १५ सप्टेंबर रोजी ओढले होते.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस