शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

ग्रेट! नागपुरात झाली रक्ताभिसरण थांबवून हृदयावर दुर्मिळ शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 21:56 IST

वोक्हार्टचे डॉ. पाठक यांनी रुग्णाच्या शरीराचे ४४ मिनिटे रक्ताभिसरण थांबवून हृदयाच्या महाधमनीवर दुर्मीळ व यशस्वी शस्त्रक्रिया करून रुग्णाला जीवनदान दिले.

ठळक मुद्दे४४ मिनिटे रक्ताविना होते शरीररुग्णाला मिळाले जीवनदान

आॅनलाईन लोकमतनागपूर : हृदयाच्या महाधमनीला असामान्य सूज आल्याने रुग्णाला वेदना आणि श्वास घेण्यास अडचण जात होती. कार्डिओ थोरॅसिक सर्जन डॉ. समीत पाठक यांनी त्यांना तपासल्यावर धमनी रक्ताच्या गुठळ्यांनी भरली होती. तर काही ठिकाणी कॅल्शियम साचले होते. महाधमनीतील स्पंदन छातीला हात लावला तरी अनुभवता येत होते. ही महाधमनी (अ‍ॅन्युरिझम) अचानक फुटली तर जीवाला धोका होता. यामुळे नागपूरच्या रामनगर येथील भरत बोबडे या ४३ वर्षीय रुग्णाला हृदयात तीव्र वेदना व श्वास घेण्यास अडचण जात होती. त्याची तपासणी व काही चाचण्या केल्यावर शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला. डॉ. पाठक यांनी सांगितले, हृदय शस्त्रक्रियेमध्ये उर उघडणे ही सामान्यपणे पहिली पायरी असते. परंतु या रुग्णाबाबतीत असे करणे शक्य नव्हते. कारण हृदयातील महाधमनीची सूज (स्यूडो अन्युरिझम) उरोस्थीला (छातीच्या बरगड्या) खालून स्पर्श करीत हाती आणि अशा स्थितीत उर उघडल्यास महाधमनी लगेच फुटण्याची शक्यता होती. यामुळे ही शस्त्रक्रिया ‘डीप हायपोथर्मिक सर्क्युलेटरी अरेस्ट’ या विशिष्ट तंत्राने करण्यात आली. या प्रक्रियेत रुग्णाच्या उजव्या मांडीतील उर-धमनी आणि उर-शीरा या दोन्हीतून ‘कॅन्युला’ (नळी) टाकण्यात आली. रुग्णाला ‘कार्डिओ पल्मोनरी बायपास’ यंत्रावर ठेवण्यात आले. शरीराचे तापमान ३६ डिग्रीपासून सुरू करून हळूहळू १८ डिग्री सेल्सियसपर्यंत नेण्यात आले. या तापमानावर हृदय स्पंदन थांबते आणि आंकुचन होते. ही प्रक्रिया होताच शरीरातील रक्ताभिसरण पूर्णपणे थांबविण्यात आले. रुग्णाच्या शरीरातील संपूर्ण रक्त ‘हार्ट लंग’ यंत्रातील ‘व्हिनस रिझर्व्हायर’मध्ये साठविण्यात आले. रक्त पुरवठ्याच्या अभावामुळे होणाऱ्या क्षतीपासून मेंदूचे संरक्षण करण्यासाठी सगळी काळजी घेण्यात आली. ठरल्याप्रमाणे धमनीतील रक्ताच्या गुठळ्या काढण्यात आल्या. महाधमनीचा चढता भाग नीट करण्यात आला. उर धमनीतून रक्तप्रवाह सुरू करण्यात आला. रुग्णाला पुन्हा उष्ण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. शरीराचे तापमान सामान्य होताच हृदयाचे स्पंदन पुन्हा सुरू झाले. रक्ताभिसरण बंद असण्याचा कालावधी ४४ मिनिटे होता. हळूहळू मेंदूच्या मज्जासंस्थेत सुधारणा झाली. रुग्णाला इस्पितळातून सुटी देण्यात आली.  या शस्त्रक्रियेत न्यूरोलॉजिस्ट डॉ. केतन चतुर्वेदींनी मदत केली. 

 

टॅग्स :Healthआरोग्य