शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्षाला एकरी एक लाख मदत द्या; आमदार रोहित पवार, सुमन पाटील यांची मागणी

By मंगेश व्यवहारे | Updated: December 15, 2023 12:47 IST

सडके, गळके द्राक्ष हातात घेऊन आमदार रोहित पवार आणि आमदार सुमन पाटील यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले.

नागपूर : गेल्या तीन वर्षांपासून द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात आहे. अवकाळीमुळे त्यांचे कंबरडे मोडले आहे. मात्र, सरकारने अद्याप द्राक्ष उत्पादक बागायतदार शेतकऱ्यांचे पंचानामेदेखील केलेले नाहीत. प्रत्येक एकरामागे चार लाखाचा खर्च द्राक्ष उत्पादकांना करावा लागतो. यंदा, एक रुपयाही भाव मिळत नसल्याची परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर द्राक्षाला एकरी एक लाख मदत द्यावी, अशी मागणी आमदार रोहित पवार आणि आमदार सुमन पाटील यांनी शुक्रवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केली. 

सडके, गळके द्राक्ष हातात घेऊन आमदार रोहित पवार आणि आमदार सुमन पाटील यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले,‘गेल्या वर्षीदेखील द्राक्षांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळालेली नाही. यावर्षीची परिस्थिती अजून बिकट आहे. आमदार सुमन पाटील यासंदर्भात वारंवार सभागृहात बोलण्याचा प्रयत्न करताहेत. पण, त्यांना बोलू देण्यात येत नाही. मराठवाड्यात लाखो शेतकरी आत्महत्याचा विचार करत आहे. त्या शेतकऱ्यांबाबत सरकारला काहीही पडलेले नाही. या सरकारमध्ये मंत्रिपद कसे टिकवता येईल, निधी कसा ओढता येईल, ही तगमग दिसून येत असल्याची टीका रोहित पवार यांनी केली. 

कोर्टात टिकणारे आरक्षण द्यागुरुवारी रात्री दीड वाजतापर्यंत मराठा आरक्षणावर चर्चा झाली. सभागृहात एक मंत्री उपस्थित राहतो आणि आम्ही भाषणं देतो. आता भाषणं भरपूर झालीत. सरकारने पाच मिनिटांचे भाषण द्यावे. पण, न्यायालयात टिकणारे आरक्षण द्यावे, असे रोहित पवार म्हणाले. 

एक हजार एकरवर हवी एमआयडीसीकर्जत-जामखेड येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार राम शिंदे यांच्या सूचनेप्रमाणे एमआयडीसी सुरू करावी. पण, एमआयडीसी किमान १ हजार एकर जागेवर आणि वन विभागाच्या परवानगीचा अडथळा नसावा. तिथे केवळ गोदामे होऊ नयेत. मोठ्या कंपन्या यायला हव्यात. त्या माध्यमातून रोजगार निर्माण होईल, असे पवार यांनी स्पष्ट केले.   

टॅग्स :FarmerशेतकरीRohit Pawarरोहित पवारvidhan sabhaविधानसभा