शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

अंधार कोठडीतील पणत्या पेरणार समाजमनात प्रकाश; कारागृहातील वस्तूंचे विक्री आणि प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2022 21:18 IST

Nagpur News कारागृहात निर्माण करण्यात आलेल्या पणत्यांसह विविध वस्तूंची विक्री आणि प्रदर्शनी नागपूरच्या अजनी रेल्वे स्थानकावर लावण्यात आली आहे.

ठळक मुद्देराज्य माहिती आयुक्तांकडून रेल्वे स्थानकावर उद्घाटन

नागपूर : कारागृहातील अंधार कोठडीत राहणाऱ्या कैद्यांनी तयार केलेल्या पणत्या (मातीचे दिवे) या दिवाळीत घराघरांत, समाजमनात प्रकाश पेरणार आहेत. कारागृहात निर्माण करण्यात आलेल्या पणत्यांसह विविध वस्तूंची विक्री आणि प्रदर्शनी नागपूरच्या अजनी रेल्वे स्थानकावर लावण्यात आली आहे. या प्रदर्शनीचे उद्घाटन राज्य माहिती आयोगाचे नागपूर विभागाचे आयुक्त राहुल पांडे यांच्या हस्ते मंगळवारी पार पडले.

कारागृहातील बंदिस्त कैदी बाहेर पडल्यानंतर स्वावलंबी व्हावे, त्यांना रोजगाराची चणचण भासू नये म्हणून त्यांना कारागृहात विविध वस्तू निर्माण करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. येथील मध्यवर्ती कारागृहात पाचशेंवर कुशल कारागीर आहेत, जे वेगवेगळ्या कलेत निपुण आहेत. त्यांच्याकडून बनविले जाणारे फर्निचर, दऱ्या, टॉवेल, चादर, रुमाल, लोखंडी तसेच कापडाच्या शोभेच्या वस्तूंना मोठी मागणी असते. दरवर्षी कैद्यांकडून रक्षाबंधनाच्या वेळी आकर्षक राख्या, तर दिवाळीपूर्वी विविध शोभेच्या वस्तू आणि पणत्या बनविल्या जातात. यंदाही मोठ्या प्रमाणावर त्याची निर्मिती करण्यात आली. कारागृहात निर्मित वस्तूंच्या विक्रीचे केंद्र अजनी रेल्वे स्थानकावर सुरू करण्यात आले आहे.

या विक्री केंद्रावर दिवाळीच्या निमित्ताने रंगीबेरंगी पणत्या, हातमागाच्या साड्या, लाकडी व लोखंडी शोभेच्या वस्तू, दऱ्या, शो पीस, कपडे, चादर, टॉवेल, आसन पट्ट्या, आदी विविध वस्तूंची प्रदर्शनी लावण्यात आली. त्याचे उद्घाटन माहिती आयोगाचे आयुक्त राहुल पांडे यांनी मंगळवारी सकाळी ११ वाजता केले. यावेळी धंतोलीच्या ठाणेदार प्रभावती एकुरके, मैत्री परिवाराचे चंदूजी पेंडके, विजय जथे, कारागृहाचे अधीक्षक अनुपकुमार कुमरे, उपअधीक्षक दीपा आगे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी वामन निमजे, आनंद पानसरे, आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कैद्यांनी निर्माण केलेल्या एकापेक्षा एक चांगल्या वस्तू बघून पाहुण्यांनी कारागीर कैद्यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली.

हीच आमची खरी दिवाळी

आम्ही अंधार कोठडीत राहत असलो आणि त्यामुळे आमच्या घरी उत्साहाने दिवाळी साजरी केली जात नसली तरी आम्ही निर्माण केलेल्या पणत्या अनेक घरासमोरचा अंधार दूर करणार आहेत. गावोगावी, गल्लोगल्ली या पणत्या प्रकाश पेरणार आहेत, त्याची जाणीव आम्हाला आहे. तीच आमच्यासाठी खरी दिवाळी आहे, अशी भावना यावेळी कार्यक्रमाच्या वेळी कारागीर कैद्यांनी व्यक्त केली.

----

टॅग्स :jailतुरुंग