शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

नागपुरात भव्य राष्ट्रधर्म कीर्तन महोत्सव उद्यापासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 19:17 IST

यावर्षीचा राष्ट्रधर्म कीर्तन महोत्सव ५ ते १० जानेवारीपर्यंत महालमधील चिटणीस पार्क मैदानावर होणार आहे. रोज सायंकाळी ६.३० वाजता कीर्तनाला प्रारंभ होईल. संतदर्शन हा कीर्तनाचा विषय आहे. महोत्सवात युवा कीर्तनकारांना निमंत्रित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देसंतदर्शन विषय : युवा कीर्तनकारांचा सहभाग वैशिष्ट्य

आॅनलाईन लोकमत

नागपूर : यावर्षीचा राष्ट्रधर्म कीर्तन महोत्सव ५ ते १० जानेवारीपर्यंत महालमधील चिटणीस पार्क मैदानावर होणार आहे. रोज सायंकाळी ६.३० वाजता कीर्तनाला प्रारंभ होईल. संतदर्शन हा कीर्तनाचा विषय आहे. महोत्सवात युवा कीर्तनकारांना निमंत्रित करण्यात आले आहे.संयोजक श्रीपाद रिसालदार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत महोत्सवाची विस्तृत माहिती दिली. राष्ट्रधर्म कीर्तन महोत्सव आयोजन समिती व राधा-गोविंद चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचे हे सहावे वर्ष होय. ५ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता प्रफुल्ल माटेगावकर प्रस्तुत ‘सह्याद्रीतील सात रत्ने’ कार्यक्रमाने महोत्सवाचे उद्घाटन होईल. त्यानंतर आचार्य जितेंद्रनाथ महाराज (देवनाथमठ, अंजनगावसुर्जी) यांच्या हस्ते महोत्सवाच्या संकेतस्थळाची सुरुवात केली जाईल. ६ जानेवारी रोजी शेखरबुवा व्यास (पुणे) हे ‘संत ज्ञानेश्वर’, ७ जानेवारी रोजी मानसी बडवे (पुणे) या ‘संत मीराबाई’, ८ जानेवारीला दिगंबरबुवा नाईक (नागपूर) हे ‘संत तुकडोजी महाराज’, ९ जानेवारी रोजी श्रेयसबुवा बडवे (पुणे) हे ‘संत तुलसीदास’ तर, १० जानेवारीला संदीपबुवा मांडके (पुणे) हे ‘संत कबीर’ विषयावर कीर्तन करणार आहेत. महोत्सवातून जमा होणाऱ्या  आरतीच्या पैशांसह एकूण ५१ हजार रुपये उत्तर नागपुरात गरीब मुलांसाठी शाळा चालविणारे नागेश पाटील यांना प्रदान केले जाणार आहेत असे रिसालदार यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत हभप दिगंबरबुवा नाईक, पुष्कर लाभे, रमेश पोफळी आदी उपस्थित होते.विदर्भातील कीर्तनकार मोठी बिदागी मागतातविदर्भातील काही प्रसिद्ध कीर्तनकार अव्वाच्यासव्वा बिदागी (मानधन) मागत असल्यामुळे त्यांचे कीर्तन महोत्सवात ठेवता येत नाही. त्यांची बिदागी आयोजकांना झेपत नाही. परिणामी नाईलाजास्तव विदर्भाबाहेरच्या कीर्तनकारांना निमंत्रित करावे लागते अशी खंत रिसालदार यांनी व्यक्त केली.

टॅग्स :cultureसांस्कृतिकnagpurनागपूर