शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठाचा ‘अ’ ग्रेडचा दर्जा संपणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 12:00 IST

वर्षाच्या शेवटपर्यंत किंवा जानेवारी २०२० पर्यंत मूल्यांकन करणे नागपूर विद्यापीठासाठी अत्यावश्यक आहे. मात्र एसएसआर पाठविला नसल्याने मूल्यांकन होणे शक्य नाही व त्यामुळे डिसेंबर २०१९ नंतर विद्यापीठ ग्रेडविना राहणार आहे.

ठळक मुद्देएसएसआर पाठविण्यात अपयशी नॅकचे मूल्यांकन रखडले

आशिष दुबे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ‘ए’ ग्रेडचा दर्जा संपण्याची स्थिती निर्माण झाली आहे. विद्यापीठाने राष्ट्रीय मूल्यांकन व प्रत्यायन परिषदे(नॅक)कडे सेल्फ स्टडी रिपोर्ट पाठविलेलाच नसल्याने ‘अ’ दर्जा जाण्याची वेळ विद्यापीठावर आली आहे. या रिपोर्टशिवाय नॅकची टीम पाहणी करण्यास येणार नाही. दरम्यान, वर्षाच्या शेवटपर्यंत किंवा जानेवारी २०२० पर्यंत मूल्यांकन करणे विद्यापीठासाठी अत्यावश्यक आहे. मात्र एसएसआर पाठविला नसल्याने मूल्यांकन होणे शक्य नाही व त्यामुळे डिसेंबर २०१९ नंतर विद्यापीठ ग्रेडविना राहणार आहे.लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार, विद्यापीठाचा एसएसआर अद्याप तयारच झालेला नाही. हा रिपोर्ट तयार करण्यास कमीतकमी दोन महिन्याचा काळ लागणार आहे. एसएसआर तयार झाल्यानंतर त्यावर विविध प्राधिकरणाकडून मंजुरी प्राप्त करावी लागेल. या मंजुरीनंतरच विद्यापीठ नॅकला एसएसआर पाठवू शकते. या कामात किमान सहा महिन्याहून अधिक वेळ लागणार आहे. एसएसआर पाठविल्यानंतर नॅक त्याची समीक्षा करेल.समीक्षेनंतर दौऱ्याची तारीख ठरविली जाईल. जोपर्यंत नॅकचा निर्णय येईल, तोपर्यंत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, कार्यकारी प्र-कुलगुरु डॉ. विनायक देशपांडे यांचा कार्यकाळ संपून जाईल. यांच्या कार्यकाळाबरोबरच प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी यांचासुद्धा कार्यकाळ संपेल. कुलगुरू डॉ. काणे यांचा कार्यकाळ २०२० पर्यंत आहे.त्यानंतर नवीन कुलगुरूची निवड प्रक्रिया सुरू होईल. त्यासाठी दोन महिन्याचा वेळ लागेल. नवीन कुलगुरूच्या निवडीनंतरच नॅक मूल्यांकनाची प्रक्रिया पुन्हा सुरू होऊ शकते. तोपर्यंत विद्यापीठाला नॅकने दिलेल्या ‘अ’ दर्जाचा अवधी संपून जाईल. २०१४ मध्ये विद्यापीठाला नॅकचा दर्जा मिळाला होता. त्याचा अवधी पाच वर्षापर्यंत असतो. हा अवधी डिसेंबर २०१९ ला संपणार आहे.

अनुदान बंद होण्याची शक्यता२०१४ मध्ये नॅकने ‘अ’ दर्जा दिल्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) व राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियान(रुसा)अंतर्गत विद्यापीठ अनुदानासाठी पात्र ठरले होते. विद्यापीठाचा ‘अ’ दर्जा जानेवारी २०२० ला संपेल. त्यामुळे यूजीसी व रुसाअंतर्गत विकासासाठी मिळणारे अनुदानसुद्धा बंद होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ