शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांकडून होतेय गोवारींच्या अधिकाराचे हनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 23:13 IST

२५ जानेवारी २०१९ रोजी न्यायालयाने गोवारींना ताबडतोब जात वैधता प्रमाणपत्र देण्याचा निर्णय दिला. तेव्हापासून नागपूर अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नागपूरने ७०० च्यावर वैधता प्रमाणपत्र दिले. पण २४ जुलै २०२० नंतर चार जिल्ह्याचा कारभार पाहणाऱ्या समितीने एकही जात वैधता प्रमाणपत्र दिले नाही.

ठळक मुद्देसह आयुक्त जात पडताळणी समितीच्या विरोधात गोवारींमध्ये असंतोष : चार जिल्ह्याचा कारभार असताना एकही वैधता प्रमाणपत्र मिळाले नाही

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १४ ऑगस्ट २०१८ रोजी गोवारींना आदिवासींच्या सवलती लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला. पण प्रशासनाने गोवारींचे हक्क मिळवून देण्यास अडचण निर्माण केली. साध्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी गोवारींना पुन्हा न्यायालयात जावे लागले. तेव्हा २५ जानेवारी २०१९ रोजी न्यायालयाने गोवारींना ताबडतोब जात वैधता प्रमाणपत्र देण्याचा निर्णय दिला. तेव्हापासून नागपूर अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नागपूरने ७०० च्यावर वैधता प्रमाणपत्र दिले. पण २४ जुलै २०२० नंतर चार जिल्ह्याचा कारभार पाहणाऱ्या समितीने एकही जात वैधता प्रमाणपत्र दिले नाही.याला अमरावतीहून नागपूर समितीवर सह आयुक्त म्हणून आलेल्या प्रीती बोंदरे या कारणीभूत असल्याचा आरोप गोवारी समाजाच्या संघटनांनी केला आहे. आदिवासी गोवारी समाज संघटनेचे अध्यक्ष कैलास राऊत यांचा आरोप आहे की, समिती उपायुक्तासारखे महत्त्वाचे पद शासनाने राजकीय दबावापोटी अवनत करून खालच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे. जेव्हापासून बोंदरे या पदावर रुजू झाल्या आहेत, तेव्हापासून आदिवासी विद्यार्थी जात वैधता प्रमाणपत्रापासून वंचित आहेत. संघटनेने असाही आरोप केला की सह आयुक्त बोंदरे या आठवड्यातून दोनच दिवस कार्यालयात असतात. विशेष म्हणजे आदिवासी विभागाने ३० एप्रिल रोजी आदिवासी विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश दिले होते. पण अधिकारी शासनाच्या आदेशाची अवहेलना करीत आहे. आजच्या घडीला विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू झाले आहे. शिक्षणाच्या बाबतीत गोवारी समाजाचा विद्यार्थी मागास राहिलेला आहे. जात वैधता प्रमाणपत्रामुळे तो व्यावसायिक अभ्यासक्रमात पात्र ठरत आहे. पण अधिकारी जात वैधता प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करीत असल्याने विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमापासून वंचित राहणार आहे.

- तरीही आम्हाला डावलण्यात येत आहेगोवारींना आदिवासींच्या सवलती देण्यासंदर्भात न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहे. शासन व प्रशासनाकडून गोवारींचा अधिकार डावलण्यात येत आहे. हा समाजावर एकप्रकारे करण्यात येत असलेला अन्याय आहे, अशी भावना संघटनेने व्यक्त केली आहे.

टॅग्स :communityसमाजnagpurनागपूर