शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

छळवादी मुख्याधिकाऱ्याच्या बांधल्या मुसक्या; ब्ल्यू फिल्मचा होता शौकीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 13:55 IST

वानाडोंगरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी भरत नंदनवार यांनी मनमाड, महाबळेश्वर आणि अन्य काही ठिकाणी ब्ल्यू फिल्म दाखवून अनैसर्गिक पद्धतीने शरीर संबंध प्रस्थापित केले. पत्नीने विरोध केला असता आरोपी मारहाण करायचा.

ठळक मुद्देवानाडोंगरी नगरपालिकेत आहे मुख्याधिकारीबलात्काराचा आरोपदुसऱ्या महिलेशी केला घरठाव, पत्नीची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पत्नीचा तब्बल सात वर्षे छळ करून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या वानाडोंगरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी भरत बाबुराव नंदनवार आणि त्यांची आई तसेच भाऊ या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.त्यांच्या पत्नीने नोंदविलेल्या तक्रारीनुसार, १० एप्रिल २०१२ ते मार्च २०१९ पर्यंत आरोपी भरत नंदनवार यांनी मनमाड, महाबळेश्वर आणि अन्य काही ठिकाणी ब्ल्यू फिल्म दाखवून अनैसर्गिक पद्धतीने शरीर संबंध प्रस्थापित केले. पत्नीने विरोध केला असता आरोपी मारहाण करायचा. पत्नी गर्भवती असतानादेखील आरोपी विकृत कृती करायचा. त्यामुळे फेब्रुवारी २०१७ मध्ये तिला अपघातही झाला. मात्र अशाही स्थितीत आरोपी नंदनवार पीडित महिलेवर अत्याचार करायचा. त्याची आईही त्याला साथ द्यायची. पत्नीने विरोध केला असता १५ एप्रिल २०१४ ला आरोपीने घरातून हाकलून देऊन मारण्याची धमकी दिली.

जुलै २०१४ ला मुलीचा जन्म झाल्यानंतर बल्लारपूर तसेच सिरोंचा येथे मुख्याधिकारी असताना तो वारंवार अनैसर्गिक अत्याचार करीत होता. १५ जानेवारी २०१९ ला आरोपी घर सोडून निघून गेला. मार्च २०१९ ला लहान मुलीला एकटे सोडून आरोपी सासू शोभाबाई तसेच पराग नंदनवार यांनीही पळ काढला. ही बाब फिर्यादीने आरोपी पतीला सांगितली असता त्यांनी तिला घर खाली करून करून निघून जाण्याची धमकी दिली. त्यानंतर नातेवाईकांच्या माध्यमातून घटस्फोट मिळावा म्हणून दबाव आणला. एवढेच नाही तर, घटस्फोट झाला नसतानादेखील अचल नामक महिलेसोबत वर्धमान नगरातील परंपरा सभागृहात डिसेंबर २०१९ मध्ये लग्न लावून आरोपीने पत्नीची फसवणूक केली. त्यामुळे पत्नीने आरोपी पती नंदनवार, त्याचा भाऊ आणि आईविरुद्ध अंबाझरी ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर गुरुवारी याप्रकरणी अनैसर्गिक अत्याचार करून छळ करणे, मानसिक त्रास देणे, फसवणूक करणे आदी आरोपांखाली गुन्हा दाखल केला. आरोपी पती नंदनवारला अटक करण्यात आली आहे.लग्नासाठी आत्महत्येची धमकीपीडित पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार, तिने लग्न करावे म्हणून आरोपीने आधी तिच्या मागे तगादा लावला होता. तू लग्न केले नाही तर आत्महत्या करेन, अशी धमकीही आरोपी द्यायचा. लग्नानंतर मात्र त्याने तिचा अनन्वित छळ केला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी