छळवादी मुख्याधिकाऱ्याच्या बांधल्या मुसक्या; ब्ल्यू फिल्मचा होता शौकीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 10:46 AM2020-09-19T10:46:08+5:302020-09-19T13:55:12+5:30

वानाडोंगरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी भरत नंदनवार यांनी मनमाड, महाबळेश्वर आणि अन्य काही ठिकाणी ब्ल्यू फिल्म दाखवून अनैसर्गिक पद्धतीने शरीर संबंध प्रस्थापित केले. पत्नीने विरोध केला असता आरोपी मारहाण करायचा.

govt officer arrested; complaint by wife | छळवादी मुख्याधिकाऱ्याच्या बांधल्या मुसक्या; ब्ल्यू फिल्मचा होता शौकीन

छळवादी मुख्याधिकाऱ्याच्या बांधल्या मुसक्या; ब्ल्यू फिल्मचा होता शौकीन

Next
ठळक मुद्देवानाडोंगरी नगरपालिकेत आहे मुख्याधिकारीबलात्काराचा आरोपदुसऱ्या महिलेशी केला घरठाव, पत्नीची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पत्नीचा तब्बल सात वर्षे छळ करून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या वानाडोंगरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी भरत बाबुराव नंदनवार आणि त्यांची आई तसेच भाऊ या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
त्यांच्या पत्नीने नोंदविलेल्या तक्रारीनुसार, १० एप्रिल २०१२ ते मार्च २०१९ पर्यंत आरोपी भरत नंदनवार यांनी मनमाड, महाबळेश्वर आणि अन्य काही ठिकाणी ब्ल्यू फिल्म दाखवून अनैसर्गिक पद्धतीने शरीर संबंध प्रस्थापित केले. पत्नीने विरोध केला असता आरोपी मारहाण करायचा. पत्नी गर्भवती असतानादेखील आरोपी विकृत कृती करायचा. त्यामुळे फेब्रुवारी २०१७ मध्ये तिला अपघातही झाला. मात्र अशाही स्थितीत आरोपी नंदनवार पीडित महिलेवर अत्याचार करायचा. त्याची आईही त्याला साथ द्यायची. पत्नीने विरोध केला असता १५ एप्रिल २०१४ ला आरोपीने घरातून हाकलून देऊन मारण्याची धमकी दिली.

जुलै २०१४ ला मुलीचा जन्म झाल्यानंतर बल्लारपूर तसेच सिरोंचा येथे मुख्याधिकारी असताना तो वारंवार अनैसर्गिक अत्याचार करीत होता. १५ जानेवारी २०१९ ला आरोपी घर सोडून निघून गेला. मार्च २०१९ ला लहान मुलीला एकटे सोडून आरोपी सासू शोभाबाई तसेच पराग नंदनवार यांनीही पळ काढला. ही बाब फिर्यादीने आरोपी पतीला सांगितली असता त्यांनी तिला घर खाली करून करून निघून जाण्याची धमकी दिली. त्यानंतर नातेवाईकांच्या माध्यमातून घटस्फोट मिळावा म्हणून दबाव आणला. एवढेच नाही तर, घटस्फोट झाला नसतानादेखील अचल नामक महिलेसोबत वर्धमान नगरातील परंपरा सभागृहात डिसेंबर २०१९ मध्ये लग्न लावून आरोपीने पत्नीची फसवणूक केली. त्यामुळे पत्नीने आरोपी पती नंदनवार, त्याचा भाऊ आणि आईविरुद्ध अंबाझरी ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर गुरुवारी याप्रकरणी अनैसर्गिक अत्याचार करून छळ करणे, मानसिक त्रास देणे, फसवणूक करणे आदी आरोपांखाली गुन्हा दाखल केला. आरोपी पती नंदनवारला अटक करण्यात आली आहे.

लग्नासाठी आत्महत्येची धमकी
पीडित पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार, तिने लग्न करावे म्हणून आरोपीने आधी तिच्या मागे तगादा लावला होता. तू लग्न केले नाही तर आत्महत्या करेन, अशी धमकीही आरोपी द्यायचा. लग्नानंतर मात्र त्याने तिचा अनन्वित छळ केला.
 

Web Title: govt officer arrested; complaint by wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.