शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपाल म्हणाले, संघस्थानावरून आल्याचा अभिमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 20:58 IST

साधारणत: राज्यपालपद हे धर्म, पंथ, भाषा, पक्ष, संघटना, राजकारण यांच्या चौकटीत बसत नाही. राज्यपालपदावर बसल्यानंतर कुणाचीही बाजू न घेता निष्पक्षपणे भूमिका मांडावी लागते. मात्र राज्याचे राज्यपाल चे.विद्यासागर राव यांनी मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर स्तुतिसुमने वाहिली. संघस्थानावरून आल्याचा आपल्याला अभिमान असल्याचे प्रतिपादन केले. रामटेक येथील त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा वाद सुरू होण्याची चिन्हे आहेत.

ठळक मुद्देसंघाबाबत अनेक गैरसमज : सर्वसमावेशक संघटना असल्याचे उद्गार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साधारणत: राज्यपालपद हे धर्म, पंथ, भाषा, पक्ष, संघटना, राजकारण यांच्या चौकटीत बसत नाही. राज्यपालपदावर बसल्यानंतर कुणाचीही बाजू न घेता निष्पक्षपणे भूमिका मांडावी लागते. मात्र राज्याचे राज्यपाल चे.विद्यासागर राव यांनी मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर स्तुतिसुमने वाहिली. संघस्थानावरून आल्याचा आपल्याला अभिमान असल्याचे प्रतिपादन केले. रामटेक येथील त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा वाद सुरू होण्याची चिन्हे आहेत.आपल्या भाषणादरम्यान लालकृष्ण अडवाणींच्या एका पुस्तकाचा दाखला देत असताना ते बोलत होते. संघस्थानावरून आपण आलो आहोत व ते आपण अभिमानाने सांगतो. २१ व्या वर्षी प्रचारक असताना अडवाणींना संघावर लादलेली बंदी व संघावर टीका होत असतानादेखील स्पष्टीकरण न दिले जाणे याबाबत प्रश्न पडले होते. याबाबत त्यांनी गोळवलकर गुरुजी यांनाच विचारणा केली होती. संघाचे लिखीत संविधान सरकारने मागितले तर ते त्यांना देण्यात येईल. तसेच धर्मनिरपेक्षता काय आहे हे सरकारला समजायला हवे असे उत्तर देत गोळवलकरांनी अशोकचक्राचे उदाहरण दिले होते. असे अनेक प्रश्न संघस्थानी विचारले जातात व प्रत्येकाच्या मनातील शंकांचे योग्य समाधान केले जाते. १९२५ पासून ही प्रक्रिया सुरू आहे. संघावर टीका होत असते व ती होतच असेल. मात्र आतापर्यंतचा प्रवास पाहता डॉ.हेडगेवार यांनी मांडलेले तत्त्वज्ञान मजबूत होते हे दिसून येते, असे राज्यपाल म्हणाले.सोबतच संघाने व्यक्तीचे मत तसेच पूजाअर्चना, धर्माच्या अधिकारांचा नेहमीच आदर केला आहे. संघातून अनेक समाजप्रबोधन करणारे लोक घडले. याशिवाय समाजातील सर्वच समाजप्रबोधकांचा संघात सन्मान करण्यात येतो व आठवणदेखील करण्यात येते. संघ सर्वसमावेशक आहे हे सांगत राज्यपालांनी मुंबईतील मल्याळी समाजाचे उदाहरण दिले. नारायण गुरुजींच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमाला समाजातील पदाधिकाऱ्यांनी मला बोलविले. त्यांना वाटले की गुरुजींबाबत फारशी कुणाला माहिती नाही. मात्र संघात नारायण गुरुजींचे प्रात:स्मरण करण्यात येते. संघाबाबत लोकांचा असलेला असा गैरसमज दूर व्हायला हवा, असेदेखील राज्यपाल म्हणाले.शिक्षणप्रणालीत भारतीयत्वावर भर हवादेश एकेकाळी विश्वगुरू होता. आपले जुने वैभव परत मिळवायचे असेल तर भारतीयत्वावर भर असलेल्या शिक्षणप्रणालीची आवश्यकता आहे. शिक्षणप्रणालीत आधुनिकता, उद्यमशीलतेच्या भावनेलादेखील प्रोत्साहन दिले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपालांनी केले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnagpurनागपूर