शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

समता व बंधूता प्रस्थापित करण्यावर शासनाचा भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2018 20:59 IST

समाजात समता व बंधूता प्रस्थापित करण्यासाठीच शासन काम करीत असून, पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्त्यांनीही शासनाच्या योजना या तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे कार्य करावे, असे आवाहन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी येथे केले.

ठळक मुद्देराजकुमार बडोले : ६७ व्यक्ती, ८ संस्थांना सामाजिक न्याय विभागाचे पुरस्कार प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समाजात समता व बंधूता प्रस्थापित करण्यासाठीच शासन काम करीत असून, पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्त्यांनीही शासनाच्या योजना या तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे कार्य करावे, असे आवाहन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी येथे केले.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे मंगळवारी सकाळी दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात शाासनातर्फे सन २०१७-१८ करिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार आणि संत रोहिदास पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, खासदार कृपाल तुमाने, आ. भाई गिरकर, आ. गिरीश व्यास, आ. सुधीर पारवे, आ. डॉ. मिलिंद माने, केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य सुलेखा कुंभारे, बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य सी.एस. थूल प्रामुख्याने उपस्थित होते.राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी पुरस्कारप्राप्त कार्यकर्त्यांनी शासन व समाजातील दुवा म्हणून काम करण्याचे आवाहन केले.महापौर नंदा जिचकार, सी.एस. थूल यांनीही आपले विचर व्यक्त केले. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, जि.प.च्या समाजकल्याण अधिकारी सुकेशनी तेलगोटे आदी प्रामुख्याने उपस्थित होेते.प्रास्ताविक सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांनी केले. समाजकल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर यांनी आभार मानले.मानधनवाढीचा जीआर लवकरचयावेळी राज्यमंत्री कांबळे यांचे भाषण सुरू असताना दलित मित्र संघातर्फे भूषण दडवे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांना मानधनवाढीचा मुद्दा उपस्थित केला. प्राचार्य रमेश पाटील यांनी पुरस्कार मिळून चार वर्षे झाली तरी प्रमाणपत्र मिळाले नसल्याचा मुद्दा उपस्थित केल. मंत्र्यांच्या ऐन भाषणात हा मुद्दा उपस्थित केल्याने थोडा वेळ गोंधळ निर्माण झाला होता. परंतु राज्यमंत्री कांबळे आणि नंतर सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी यासंदर्भातील जीआर लवकरच काढण्यात येणार असल्याचे जाहीर केले. तसेच बस प्रवासाची सुविधा आणि आरोग्य सुविधेबाबतचीही प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले.सी.एल. थूल, विलास गजघाटे, प्रकाश कुंभे यांचा समावेशयावेळी शाासनातर्फे सन २०१७-१८ करिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार ६२ व्यक्ती व ६ संस्थांना, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार १ व्यक्ती व १ संस्था आणि संत रोहिदास पुरस्कार ४ व्यक्ती व १ संस्था असे एकूण ६७ व्यक्ती व ८ संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये संस्थांमध्ये पुण्यातील जनसेवा फाऊंडेशन, गडचिरोलीतील आरोग्य प्रबोधनी, ठाण्यातील इंदिराबाई गायकवाड चॅरिटेबल ट्रस्ट, सोलापूरमधील विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान पंढरपूर, कोल्हाूरमधील कोल्हापुरी लेदर चप्पल उत्पादक व विक्रेता संस्था धुळे येथील परिवर्तन विद्या प्रसारक संस्था, अमरावती येथील रविदास विश्वभारती प्रतिष्ठान आणि बीड येथील जागर प्रतिष्ठान या संस्थेला तर व्यक्तिगत स्वरुपात राज्य अनुसूचित जातीचे सदस्य सी.एल. थूल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, रिपाइंचे प्रकाश कुंभे आदींचा समवेश होता.व्यक्तीला १५ हजार व २१ हजर रुपये रोख तर संस्थेला २५ आणि ३० हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.भाऊ लोखंडे यांना घरी जाऊन पुरस्कार प्रदानज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे यांची नुकतेच शस्त्रक्रिया झाल्याने ते पुरस्कार सोहळ्यास येऊ शकले नाही. आ. डॉ. मिलिंद माने यांनी ही बाब सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या निदर्शनास आणून दिली तेव्हा बडोले यांनी स्वत: डॉ. भाऊ लोखंडे यांच्या घरी जाऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान केला. डॉ. लोखंडे यांना हा पुरस्कार देऊन पुरस्काराची उंची वाढल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी आ. डॉ. मिलिंद माने व कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे नेते कृष्णा इंगळे , डॉ. सिद्धार्थ गायकवाड उपस्थित होते.सभागृह पडले लहानया राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन लोकांसाठी सभागृहाबाहेर बसण्यासाठी खुर्च्या लावण्यात आल्या होत्या. तसेच कार्यक्रम पाहण्यासाठी मोठा स्क्रीन लावलेला होता. परंतु गर्दी अपेक्षेपेक्षा जस्त झाली. त्याप्रमाणात दीक्षाभूमीतील सभागृह लहान पडले. त्यामुळे गोंधळ उडाला होता.यांना मिळाला पुरस्कारडॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारसंस्था : जनसेवा फाऊंडेशन (पुणे), आरोग्य प्रबोधनी (गडचिरोली), इंदिराबाई गायकवाड चॅरिटेबल ट्रस्ट (ठाणे), विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान पंढरपूर (सोलापूर), कोल्हापुरी लेदर चप्पल उत्पादक व विक्रेता संस्था (कोल्हपूर), परिवर्तन विद्या प्रसारक संस्था (धुळे).व्यक्तीमुंबई :राज्य अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सी.एल. थूल, अरुण भालेकर, प्रकाश जाधव, अ‍ॅड. डॉ. प्रल्हाद खंदारे, दयानंद काटे, चंद्रकांत बानाटे, सुचित्रा इंगळे,ठाणे : साकीब गोरे, भरत खरे, विद्या धारप, डॉ. रेखा बहनवाल,सिंधुदुर्ग : चंद्रकांत जाधवरत्नागिरी : काशीराम कदमपुणे : बच्चूसिंग टाक, श्रीकांत मंत्री, प्रभाकर फुलसुंदर, सिद्धेश्वर जाधव, डॉ. जनार्दन मुनेश्वर, बापूसाहेब सरोदेसातार : विश्वनाथ शिंदे,सोलापूर : भीमराव बंडगर,कोल्हापूर - सदाशिव आंबी,सांगली : राजाराम गरुडनाशिक : राजेश सोदेजळगाव : शिवाजी पाटीलअहमदनगर : दीपक गायकवाडअमरावती : रामेश्वर अभ्यंकर, सुधाकर पोकळेनांदेड : यादव तामगाडगेनागपूर : वसंत भगत, विजय भोयर, प्रकाश कुंभे, हंसराज मेश्राम, भाऊराव लोखंडे, शरद अवथरे, भय्यालाल बिघाणे, कृष्णराव चव्हाण, भूपेश थुलकर, भाऊराव गुजर, विलास गजघाटे, करुणाताई चिमणकर, रमेशकुमार मेहरुलिया, उमाताई पिंपळकर, हभप रामकृष्णाजी सकान्युजी पौनीकर महाराज, भमरव इंगळे, परिणिता मातुरकर, दिलीप गोईकर, सांबाजी वाघमारे,गोंदिया : सविता बेदरकर, रतन वसनिकअकोला : सुचिता बनसोड,यवतमाळ : हेमंतकुमार भालेराववर्धा : राजेश अहीवभंडारा : प्रा. विनोद मेश्राम,औरंगाबाद : डॉ. ऋषिकेश कांबळे,लातूर : पंडित सूर्यवंशी, केशव कांबळे, मोमीन गफूरसब,परभणी : भमराव हत्तीअंबीरेहिंगोली : सुरजीसिंह रामसिंह वाघमरे (ठाकूर), साहेबराव कांबळेबीड. शंकर विटकरसंत रविदास पुरस्कारसंस्था : रविदासा विश्वभारती प्रतिष्ठान (अमरावती)व्यक्ती :पंढरीनाथ पवार, डॉ. रोहिदास वाघमारे (मुंबई उपनगर), डॉ. आनंद गवळी (पुणे), दगडू रामा माळी (बुलडाणा)कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कारसंस्था - जागर प्रतिष्ठान (बीड)व्यक्ती : मीरा भट (भंडारा) 

टॅग्स :Rajkumar Badoleराजकुमार बडोलेsocial workerसमाजसेवक