शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

"ओबीसी आरक्षणासाठी सरकारवर दबाव टाकावा लागेल"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2021 10:23 AM

ओबीसी आरक्षणाच्या(obc reservation) मुद्द्यावर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले नाही आणि सरकारला नाक दाबून तोंड उघडायला भाग पाडले नाही तर येणाऱ्या पाच वर्षात नगरपालिका आणि महानगरपालिकामध्ये ओबीसीच प्रतिनिधित्व दिसणार नाही असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देचंद्रकांत पाटील : भाजपातर्फे विदर्भ विभागीय मेळाव्याचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याच्या मानसिकतेत नाही. जर ओबीसी समाजाला आरक्षण हवे असेल तर त्यांना जनआंदोलन उभारून सरकारवर दबाव टाकावा लागेल, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी केले आहे. भाजपच्या ओबीसी जागर अभियानाअंतर्गत बुधवारी महर्षी व्यास सभागृहात आयोजित ओबीसी मोर्चाच्या विभागीय मेळाव्यादरम्यान ते बोलत होते.

लवकरच २५४ नगरपालिका, २८ महानगरपालिका व २६ जिल्हा परिषदांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय व्हावी, अशी सरकारची इच्छा आहे. ओबीसी समाजाला गावागावांत आंदोलन उभारावे लागेल. भाजप ओबीसी आरक्षणासाठी पूर्ण प्रयत्न करेल. जर सरकारने मनात आणले तर तीन दिवसांच्या आत इम्पिरिकल डाटा तयार करू शकते, असा दावा पाटील यांनी केला. सरकारने ओबीसी आयोगाचे गठन तर केले आहे, मात्र त्याला पंगू बनविले आहे. ४९२ कोटी रुपये अद्याप देण्यात आलेले नाहीत. आयोगाचे सदस्य आता राजीनामा देत आहेत. हे सरकारमुळेच होत असल्याचा वक्त्यांचा सूर होता.

या वेळी खा. विकास महात्मे, माजी मंत्री संजय कुटे, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, खा. रामदास तड़स, खा. अशोक नेते, खा. सुनील मेंढे, भाजपा प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुले, आ. कृष्णा खोपड़े, आ. परिणय फुके, आ. पंकज भोयर, आ. प्रवीण दटके, महापौर दयाशंकर तिवारी, मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, रमेश चोपडे प्रामुख्याने उपस्थित होते.

कॉंग्रेस, शिवसेना आरक्षणाच्या समर्थनार्थ नाहीत

कॉंग्रेस ओबीसींना राजकीय आरक्षण देऊ इच्छित नाही व शिवसेनेचादेखील आरक्षणाला विरोध आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील आरक्षणाच्या समर्थनार्थ नव्हते. सर्वोच्च न्यायालयाच्या दिशानिर्देशांचे पालन झाल्यावर आरक्षण कायम होऊ शकते. परंतु सरकार त्यासाठी उत्सुक नाही, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी लावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याइतके कोणत्याही नेत्याने ओबीसींसाठी काम केलेल नाही, असा दावा हंसराज अहीर यांनी केला. तर मंत्री छगन भुजबळ व विजय वडेट्टीवार हे ओबीसी आरक्षणासाठी दिखावा करत असल्याचा आरोप संजय कुटे यांनी लावला. कृष्णा खोपडे हे संमेलनासाठी सतरंजीपुरा येथून समर्थकांच्या रॅलीसह सभागृहात पोहोचले.

कोरोना ‘प्रोटोकॉल’चे पालन नाही

मेळाव्यादरम्यान सुरेश भट सभागृह खचाखच भरले होते. वरिष्ठ नेत्यांसोबतच अनेक कार्यकर्तेदेखील विनामास्क उपस्थित होते. फिजिकल डिस्टन्सिंग तर नावालादेखील नव्हते. एरवी मास्क न घालणाऱ्यांविरोधात मनपाचे पथक लगेच कारवाई करते. परंतु येथे हजारो कार्यकर्ते मास्कशिवाय असताना कुणावरही कारवाई करण्यात आली नाही.

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणOBCअन्य मागासवर्गीय जातीchandrakant patilचंद्रकांत पाटील