लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरकारने देशभरात एकूण उत्पादनाच्या १५.८७ टक्के तर महाराष्ट्रात १२.५४ टक्के सोयाबीन एमएसपी दराने खरेदी केले. बाजारभाव कमी असल्याने तसेच एमएसपी दराने खरेदी यंत्रणा प्रभावी नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांना एमएसपीपेक्षा कमी दराने सोयाबीन विकावे लागले. यात त्यांना प्रतिक्विंटल किमान ७०० रुपयांचे नुकसान सहन करावे लागल्याने देशभरातील सोयाबीन उत्पादकांचे ४,७११.२८ कोटींचे तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे २,३५०.८५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचा हा आकडा पाहता एमएसपीसोबतच सरकारी खरेदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सन २०२५-२६ च्या हंगामात देशभरात १२७.२० लाख टन सोयाबीन उत्पादनाचा अंदाज केंद्रीय कृषी मंत्रालयाने तर ११०.२५ लाख टन सोयाबीन उत्पादनाचा अंदाज 'सोपा'ने व्यक्त केला होता. यात महाराष्ट्रातील ५२.५२ लाख टन सोयाबीन उत्पादनाचा समावेश आहे. या हंगामात देशभरात १०० लाख टन तर महाराष्ट्रात ४८ लाख टन सोयाबीन झाल्याचे बाजारपेठांमधील आवकवरून स्पष्ट होते. सरकारने पाच सोयाबीन उत्पादक राज्यांमधून एकूण १५.८७ लाख टन म्हणजेच एकूण उत्पादनाच्या १५.८७ टक्के (पान २ वर)
एमएसपी दराने सोयाबीन खरेदीराज्य लक्ष्य खरेदीमध्य प्रदेश २२.२१ लाख टन ८ लाख टनमहाराष्ट्र १८.५० लाख टन ६.०२ लाख टनराजस्थान २.९१ लाख टन १.५ लाख टनतेलंगणा ६० हजार टन ३५ हजार टन
सोयाबीनचे बाजारभाव (रुपये-प्रतिक्विंटल)महिना किमान दर कमाल दरनोव्हेंबर २५ ४,१०० ५,१००डिसेंबर २५ ४,२०० ५,२००जानेवारी २६ ४,७०० ५,३००फेब्रुवारी २६ ४,८०० ५,६००मार्च २०२६ ४,७०० ५,१००
एमएसपी दरातही कपात: केंद्र सरकारने २०२५-२६
च्या हंगामासाठी सोयाबीनची एमएसपी प्रतिक्विंटल ५,३२८ रुपये जाहीर केली आहे. सरकारने नाफेड व एनसीसीएफ या दोन्ही संस्थांनी ओलावा, कचरा व इतर कारणे सांगून एमएसपीपेक्षा १५ ते २० टक्के कमी दराने सोयाबीन खरेदी केले. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ७९९ ते १,०६५ रुपये एमएसपीपेक्षा कमी मिळाले. यात महाराष्ट्रात शेतकऱ्यांना ४८१.०३६ ते ६४१.१८ कोटी रुपये कमी देण्यात आले.
Web Summary : Soybean farmers nationwide face ₹4,711 crore losses due to ineffective MSP purchases. Maharashtra's farmers lost ₹2,350 crore. Farmers sold below MSP, losing ₹700/quintal. Government purchases covered only 15.87% of production, raising questions about MSP efficacy and implementation.
Web Summary : एमएसपी खरीद प्रभावी न होने से सोयाबीन किसानों को ₹4,711 करोड़ का नुकसान। महाराष्ट्र के किसानों को ₹2,350 करोड़ का नुकसान हुआ। किसानों ने एमएसपी से कम पर बेचा, ₹700/क्विंटल का नुकसान। सरकारी खरीद कुल उत्पादन का केवल 15.87% थी, जिससे एमएसपी प्रभावशीलता पर सवाल उठे।