शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

"एअर कार्गाे हबच्या सर्वाधिक उपयोगासाठी सरकारने सबसिडी द्यावी"

By मोरेश्वर मानापुरे | Updated: April 11, 2024 20:24 IST

सध्या मर्यादित स्वरुपात होतो उपयोग : प्रवासी भाड्यापेक्षा एअर कार्गोचे १५ ते २० पट भाडे, प्रशिक्षण कार्यक्रम राबवावे

नागपूर : नागपुरातील मिहान एअर कार्गाे हबचा लगतचे राज्य आणि संपूर्ण विदर्भातील कृषी आणि संबंधित माल विदेशात पाठविण्याचा थोडाफार उद्देश यशस्वी झाला, पण पूर्ण क्षमतेने उपयोग होताना दिसत नाही. त्यामुळे नाशवंत मालाची आयात-निर्यात करण्यास इच्छुक असलेल्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

एअर कार्गाेचे भाडे प्रवासी भाड्याच्या १५ ते २० पट आहे. आखाती देशाच्या अटी आणि नियमानुसार प्रक्रिया आणि पॅकिंग करून माल पाठवावा लागतो. या संदर्भात आयात-निर्यातदारांमध्ये जागरूकतेचा अभाव आहे. सरकारने एअर कार्गाेला प्रोत्साहन देण्यासाठी सबसिडी द्यावी आणि राजकीय नेत्यांनी नागपुरातून आंतरराष्ट्रीय दर्जाची एअर कार्गाे सेवा कशी उपलब्ध होईल, याकडे लक्ष देण्याची व्यावसायिकांची मागणी आहे. 

सध्या नागपुरातून दरदिवशी ३० ते ३२ विमाने वेगवेगळ्या शहरात उड्डाणे भरतात. नागपुरातून शारजाह व दोहा ही आंतरराष्ट्रीय उड्डाणे आहेत. कृषी माल काहीच तासात विदेशात पोहोचू शकतो. एका एअर कार्गाेतून ४ ते ५ टन माल पाठविला जाऊ शकतो.

विदर्भातून नाशवंत मालाची निर्यातविदर्भातून कॉन्कोरच्या माध्यमातून धान्य, लाल मिरची, कापड, प्लॉस्टिक आणि अन्य मालाची निर्यात होते. तर कृषी आणि संबंधित नाशवंत मालाची निर्यात एअर कार्गाेद्वारे होते. विमानातून संत्री, फळे, भाज्या, सजावटीची फुले आणि मिठाईसुद्धा अन्य देशांमध्ये पाठविली जाते. पण येथील अत्याधुनिक सुविधांचा मर्यादित अर्थात १० टक्केच उपयोग होतो. मालाचे भाडे परवडणारे असल्यास मालाची निर्यात मोठ्या प्रमाणात होऊ शकेल. 

निर्यातीत क्षेत्रात प्रचंड संधीविदर्भात जवळपास दीड हजार आयात-निर्यातदारांची नोंद आहे. त्यांना जागरूक करण्यासाठी चेंबरतर्फे वर्षभरात पाच ते सहादा कार्यक्रम घेण्यात येतात. पण त्यांची उपस्थिती अल्प असते. अजूनही ते जुन्याच पद्धतीने व्यवसाय करतात. या क्षेत्रात प्रचंड संधी आहेत.- अश्विन मेहाडिया, अध्यक्ष, नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स.

दर्जा राखण्यासाठी प्रशिक्षण आवश्यकविदेशात असलेल्या कृषी मालाची मागणी, दर्जा आणि अटी-नियमांचे पालन करण्यासाठी आयात-निर्यातदारांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. व्यवसाय वाढीसाठी सरकारने भाड्यात सबसिडी द्यावी. त्यामुळे मालाला किंमत मिळेल आणि व्यापारी निर्यातीसाठी पुढे येतील.- नितीन लोणकर, अध्यक्ष, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन.

सवलतीमुळेच वाढणार निर्यातीत व्यवसायमिहानमधील एअर कार्गाे हबच्या माध्यमातून कृषी मालाची निर्यात सरकारने मोठी सवलत देऊ केल्यास वाढू शकतो. यामुळे विदेशी चलन भारतात येईल. नागपूर देशाचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने लगतचे राज्य आणि विदर्भात कृषी मालाची मोठ्या प्रमाणात निर्यात होऊ शकते.डॉ. दीपेन अग्रवाल, अध्यक्ष, चेंबर ऑफ असोसिएशन आॅफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड ट्रेड (कॅमिट).