शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने आंदोलनाची वेळ आणू नये : समस्त ब्राह्मण समाजाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 22:01 IST

महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाच्या मागण्यांसंदर्भात सरकारला यापूर्वी निवेदन दिले आहे. समस्त ब्राह्मण समाज महाराष्ट्राच्या वतीने मागण्यांसंदर्भातील सर्व कागदपत्रे सादर केली आहेत. असे असले तरी सरकार या मागणीकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. त्यामुळे पुन्हा या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी ३ ऑगस्टला येथील संविधान चौकामध्ये घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा समस्त ब्राह्मण समाजाने दिला आहे.

ठळक मुद्दे३ ऑगस्टला घंटानाद आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाच्या मागण्यांसंदर्भात सरकारला यापूर्वी निवेदन दिले आहे. समस्त ब्राह्मण समाज महाराष्ट्राच्या वतीने मागण्यांसंदर्भातील सर्व कागदपत्रे सादर केली आहेत. असे असले तरी सरकार या मागणीकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. त्यामुळे पुन्हा या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी ३ ऑगस्टला येथील संविधान चौकामध्ये घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा समस्त ब्राह्मण समाजाने दिला आहे. सरकारने समाजाच्या भावना ओळखाव्यात आणि आंदोलन करण्याची वेळ आणू नये, असा इशाराही गुरूवारी झालेल्या पत्रकार परिषदेतून देण्यात आला.यावेळी मागण्यांसंदर्भात बोलताना समन्वयक विश्वजित देशपांडे म्हणाले, समाजाच्या वतीने २२ जानेवारीला मुंबईतील आझाद मैदानामध्ये धरणे देण्यात आले होते. त्यानंतर या मागण्या तत्त्वत: मान्य केल्याचे सरकारतर्फे शिष्टमंडळाला सांगितले होते. प्रत्यक्षात मागण्यांवर कोणतीही कारवाई झाली नसल्याचे लक्षात आले आहे. राज्यातील ब्राह्मण समाजाच्या ४८ संघटनांनी एकत्र येऊन समस्त ब्राह्मण समाजाची स्थापना केली आहे. या माध्यमातून समाजाच्या प्रश्नांसाठी लढा दिला जात आहे. समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे, पुरोहितांना मानधन देणे, महापुरुषांच्या बदनामीविरोधात कायदा करणे, वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करण्यासाठी कायदा तयार करणे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार घोषित करणे, राम गणेश गडकरी आणि दादोजी कोंडदेव यांचे पुतळे सन्मानासह स्थापन करणे, छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारक लवकर पूर्ण करणे, यासह १४ मुख्य मागण्यांचा यात समावेश आहे.आंदोलनासंदर्भात माहिती देताना विश्वजित देशपांडे म्हणाले, आमचा समाज साडेतीन टक्के असल्याचे सांगितले जाते, प्रत्यक्षात साडेसात टक्के आहे. राज्यात समाजाची लोकसंख्या ८५ लाख असून, सर्व समाज एकसंघ आहे. राज्यातील ५५ आमदार निवडून आणण्याची ताकद या समाजामध्ये आहे. सरकारने समाजाच्या भावना समजून घ्याव्यात. हा जनरेटा आहे, त्यामुळे सहजपणे घेऊ नये, असा निर्वाणीचा इशारा समाजाकडून आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून देणार असल्याचे ते म्हणाले.३ ऑगस्टला होणाऱ्या आंदोलनादरम्यान घंटानाद आणि शंखनाद केला जाईल. मुख्यमंत्र्यांच्या शहरातच हे आंदोलन करून त्यांचे लक्ष वेधण्यासाठी सर्वजण एकत्र येत असल्याचे त्यांनी सांगितले. निर्णय न झाल्यास भविष्यात वेगळे पाऊल उचलू, असा इशारा यावेळी देण्यात आला. या पत्रकार परिषदेला अर्चना देशमुख, संजय डगली, अजय डबीर, मनीष त्रिवेदी, रामनारायण शर्मा आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :brahman mahasanghब्राह्मण महासंघagitationआंदोलन