शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने नैसर्गिक न्यायतत्त्वाचे पालन करावे : न्या. अरुण चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 23:35 IST

ग्राम पंचायत, नगर परिषद, महानगरपालिका व कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या क्षेत्रात बदल, सुधारणा, विभागणी, नवीन भूभागाचा समावेश व क्षेत्र रचना रद्द करणे याविषयी निर्णय घेण्यापूर्वी सरकारने नैसर्गिक न्यायतत्त्वाचे पालन करणे आवश्यक आहे. हे निर्णय संबंधितांना सुनावणीची संधी देऊनच घेतले गेले पाहिजे असे पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरुण चौधरी यांनी सांगितले.

ठळक मुद्देहायकोर्ट बार असोसिएशनचे व्याख्यान

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ग्राम पंचायत, नगर परिषद, महानगरपालिका व कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या क्षेत्रात बदल, सुधारणा, विभागणी, नवीन भूभागाचा समावेश व क्षेत्र रचना रद्द करणे याविषयी निर्णय घेण्यापूर्वी सरकारने नैसर्गिक न्यायतत्त्वाचे पालन करणे आवश्यक आहे. हे निर्णय संबंधितांना सुनावणीची संधी देऊनच घेतले गेले पाहिजे असे पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरुण चौधरी यांनी सांगितले.हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरच्यावतीने शुक्रवारी न्या. चौधरी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी या विषयावरील कायदेशीर बाजू स्पष्ट केली. सरकार विविध राजकीय उद्देशाने वरीलप्रकारचे निर्णय घेत असते. हे निर्णय घेताना नैसर्गिक न्यायतत्त्वाचे पालन केले जात नाही. त्यामुळे अधिकरांचा दुरुपयोग होतो. संबंधितांना सुनावणीची संधी दिल्यास असा दुरुपयोग टाळला जाऊ शकतो याकडे न्या. चौधरी यांनी लक्ष वेधले.तत्पूर्वी त्यांनी स्वत:विषयीच्या काही जुन्या आठवणी सांगितल्या. तेव्हाच्या व आताच्या न्यायाधीशांच्या वागणुकीत मोठा बदल झाला असल्याचे ते म्हणाले. तसेच, वकिलांनी सतत संशोधन करीत राहिले पाहिजे व मिळालेली संधी गमावू नये असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर यांनी न्या. चौधरी यांचे स्वागत केले. उपाध्यक्ष अ‍ॅड. पुरुषोत्तम पाटील यांनी संचालन केले तर, सचिव अ‍ॅड. प्रफुल्ल खुबाळकर यांनी आभार माणले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर