लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुंतवणूक क्षेत्राच्या प्रतिष्ठेला काळिमा फासणाऱ्या वासनकर कंपनी गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणातील आरोपी अभिजित जयंत चौधरी याला जामीन देण्यात येऊ नये, अशी विनंती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला केली आहे.उच्च न्यायालयात चौधरीचा जामीन अर्ज प्रलंबित आहे. त्यावर राज्य सरकारने उत्तर सादर करून चौधरी जामीन देण्यास पात्र नसल्याचा दावा केला. तसेच, त्याचा अर्ज फेटाळण्याची विनंती केली. चौधरी हा वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनीचा सर्वेसर्वा प्रशांत जयदेव वासनकरचा साळा होय. या प्रकरणातील आरोपींमध्ये या दोघांसह प्रशांतची आई सरला, पत्नी भाग्यश्री, भाऊ विनय, विनयची पत्नी मिथिला, सासू कुमुद चौधरी आदींचा समावेश आहे. वासनकर कंपनीने आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून मासिक, तिमाही, वार्षिक, द्विवार्षिक, १८ महिने, ३३ महिने, ४८ महिने अशा विविध कालावधीसाठी वेगवेगळ्या योजनांतर्गत गुंतवणूकदारांकडून मोठमोठ्या रकमांच्या ठेवी स्वीकारल्या होत्या. त्यानंतर कंपनीने गुंतवणूकदारांना कराराप्रमाणे ठेवी परत केल्या नाहीत व निर्धारित परतावाही दिला नाही. अशा प्रकारे कंपनीने शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केली.
अभिजित चौधरीला जामीन देण्यास सरकारचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 00:37 IST
गुंतवणूक क्षेत्राच्या प्रतिष्ठेला काळिमा फासणाऱ्या वासनकर कंपनी गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणातील आरोपी अभिजित जयंत चौधरी याला जामीन देण्यात येऊ नये, अशी विनंती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला केली आहे.
अभिजित चौधरीला जामीन देण्यास सरकारचा विरोध
ठळक मुद्देहायकोर्टात उत्तर : वासनकर गुंतवणूकदार फसवणूक प्रकरण