शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला
3
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
4
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
5
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
6
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
7
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
8
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
9
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
10
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
11
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
12
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
14
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
15
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
16
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
17
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
18
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
19
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
20
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...

नानासाहेबांच्या स्मारकाचा शासनाला विसर

By admin | Updated: May 3, 2015 02:08 IST

नानासाहेब अर्थात प्राचार्य राम शेवाळकर. आज त्यांचा सहावा स्मृतिदिन. नानासाहेब म्हणजे चालते-बोलते ग्रंथालय, मितभाषी, हसतमुख आणि प्रसन्न चेहऱ्याचे.

राजेश पाणूरकर नागपूरनानासाहेब अर्थात प्राचार्य राम शेवाळकर. आज त्यांचा सहावा स्मृतिदिन. नानासाहेब म्हणजे चालते-बोलते ग्रंथालय, मितभाषी, हसतमुख आणि प्रसन्न चेहऱ्याचे. नानासाहेबांच्या नसण्याने सांस्कृतिक, साहित्य क्षेत्रात एक रितेपणा आला आहे. हे रितेपण सहजासहजी संपणारे नाही. नानासाहेबांच्या नसण्याने माणसांची एक समृद्ध मैफिल मुकी झाली. नानासाहेबांच्या स्मृती कायम राहाव्यात म्हणून तत्कालीन राज्य शासनाने त्यांचे स्मारक बांधण्याची घोषणा केली. महानगरपालिकेनेही स्मारक निर्माण करण्यासाठी रस दाखविला. आज तब्बल सहा वर्षे झाली पण शासनाला आणि मनपालाही राम शेवाळकरांचाच विसर पडला आहे.नागपुरातील कविवर्य सुरेश भट, कवी ग्रेस आणि प्राचार्य राम शेवाळकर यांच्यावर जगातील तमाम मराठीच नव्हे तर इतर भाषिक रसिकही प्रेम करतात. सुरेश भटांच्या नावाचे सभागृह किती गांभीर्याने घेतले जाते आहे, ते सांगायला नको. कवी ग्रेस यांच्या मृत्यूनंतर त्यांचा विचारही केला गेला नाही. प्राचार्य राम शेवाळकरांच्या निधनानंतर मात्र त्यांचे स्मारक उभे करण्यासाठी घोषणा झाल्या. तत्कालीन वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी प्राचार्य राम शेवाळकर स्मृती स्मारकासाठी १० कोटी रुपयांचा निधी राज्य शासनातर्फे देण्यात येईल, असे जाहीर केले. महानगरपालिकेनेही या स्मारकासाठी योग्य जागा उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले. सहा वर्षापूर्वी नागपुरातील काही जागांची पाहणीही करण्यात आली पण त्यानंतर मात्र काहीही झाले नाही. नानासाहेबांचा विसर शासनालाही पडला आणि महानगरपालिकेलाही त्याचे काहीच वाटले नाही. आता तर हा विषय पूर्णपणे विस्मृतीत गेला आहे. इंग्लंड मध्ये कुणीही शेक्सपिअरचा अपमान करू शकत नाही. जगभरात कुठेही शेक्सपिअरबद्दल अवमानजनक कुणी बोलले, लिहिले तर इंग्लंडच्या संसदेत निषेध ठराव पारित केला जातो. शेक्सपिअर आमच्या नसानसांमधून वाहतो, असा स्वाभिमान इंग्लंडचे लोक ठेवतात. पण आपण आपल्याच थोर साहित्यिकांबद्दल सन्मान ठेवत नाहीत. नाशिकला कुसुमाग्रजांचा स्वाभिमान आहे. पुण्यात पु. ल. देशपांडेंच्या नावाने अकादमी आहे. नागपुरात कविवर्य सुरेश भट, कवी ग्रेस, प्राचार्य शेवाळकर ही मोठ्या उंचीची माणसे होऊन गेलीत पण त्यांच्याबद्दल आमच्या मनात सन्मानपूर्वक आस्था का नसावी? नागपूर महानगरपालिका सांस्कृतिक दृष्टी ठेवणारी आहे, असे बोलले जाते. महापालिकेद्वारेही तसा दावा केला जातो. पण अवघ्या सहा वर्षात प्राचार्य राम शेवाळकरांचा मनपाला विसर का पडावा? प्रत्येक बाबींसाठी सामान्य रसिक, नागरिकांनी मनपाच्या पायऱ्या झिजवल्या तरच निगरगट्ट प्रशासन त्याची दखल घेईल, असे सुसंस्कृत म्हणवून घेणाऱ्या मनपाला का वाटावे?आता सरकार बदलले आहे. मुख्यमंत्री नागपूरचे आहेत. प्राचार्य राम शेवाळकरांची प्रतिभा आणि उंची त्यांना व्यक्तीश: माहीत आहे. त्यांच्या नावाचे स्मारक नागपुरात व्हावे म्हणून मुख्यमंत्री पुढाकार घेणार का? यापूर्वीच्या सरकारने केलेली घोषणा ते पूर्ण करू शकतात.प्राचार्य शेवाळकरांच्या निधनानंतर किमान त्यासाठी प्रयत्न सुरू राहिले असते तर समजून घेण्यासारखे होते. पण आभाळाएवढ्या उंचीच्या प्राचार्य राम शेवाळकरांचा आम्हाला विसर पडावा, हा सांस्कृतिक करंटेपणाच नाही का? त्यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त राज्य शासन आणि महानगरपालिकेने यासंदर्भात गांभीर्याने निर्णय घ्यावेत, असे मत सांस्कृतिक क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे.