शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

बालमजुरीबाबत शासकीय यंत्रणाच उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 23:42 IST

बालमजुरी हा आपल्या देशाला लागलेला कलंक आहे, असे म्हटले तरी वावगे ठरू नये. कारण जगात सर्वाधिक बालमजूर भारतात सापडतात, हे वास्तव आहे. नागपूर शहरातही आपल्याला विविध ठिकाणी बालमजूर काम करताना सरास नजरेस पडतात. गरिबी आणि घराची आवश्यकता म्हणून नाईलाजास्तव लहान वयातच मुलांना मजुरी करणे भाग पडते त्यामुळे त्यांचे बालपण, शिक्षण हिरावले जाते. यातून अनेक सामाजिक प्रश्नही निर्माण होतात. यामुळे बालमजुरीच्या समूळ उच्चाटनासाठी अनेक कायदे करण्यात आले आहेत. शासनाच्या विविध योजनाही आहे. तरीही बालमजुरी कायम आहे. कारण कायदे असले तरी त्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा मात्र उदासीन आहे. आता तर कायदाच लंगडा करण्यात आल्याने बालमजुरीचे निर्मूलन होणार तरी कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देआज बालमजुरी निर्मूलन दिननिर्मूलन होणार तरी कसे? : कायदेच लंगडे झाले

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बालमजुरी हा आपल्या देशाला लागलेला कलंक आहे, असे म्हटले तरी वावगे ठरू नये. कारण जगात सर्वाधिक बालमजूर भारतात सापडतात, हे वास्तव आहे. नागपूर शहरातही आपल्याला विविध ठिकाणी बालमजूर काम करताना सरास नजरेस पडतात. गरिबी आणि घराची आवश्यकता म्हणून नाईलाजास्तव लहान वयातच मुलांना मजुरी करणे भाग पडते त्यामुळे त्यांचे बालपण, शिक्षण हिरावले जाते. यातून अनेक सामाजिक प्रश्नही निर्माण होतात. यामुळे बालमजुरीच्या समूळ उच्चाटनासाठी अनेक कायदे करण्यात आले आहेत. शासनाच्या विविध योजनाही आहे. तरीही बालमजुरी कायम आहे. कारण कायदे असले तरी त्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा मात्र उदासीन आहे. आता तर कायदाच लंगडा करण्यात आल्याने बालमजुरीचे निर्मूलन होणार तरी कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.नागपूर शहरात अनेक ठिकाणी चहाच्या टपऱ्यांवर, ढाब्यांवर, सोनार ओळीत, किराणा ओळीत, भांडेवाडीत कचरा वेचताना, अगरबत्ती उद्योग, वरातीसमोर दिवे घेऊन चलणारे, पतंग व्यवसाय, पूजेचे नारळ तयार करणे, झालर व दरवाजाचे तोरण तयार करणे, काचपत्रे शिशा, लोखंड गोळा करणे, बांधकाम आदी ठिकाणी आपल्याला अनेक छोटू नावाचे बालमजूर आढळून येतात. या बालमजुरांबाबत मालकाकडे विचारणा केली तर यांच्या भरवशावरच त्यांचे घर चालते? असे उत्तर मिळते. ही बाब काही प्रमाणात खरीही असते. पालकांना विचारले तर वेगळाच सूर असतो. दिवसभर इकडे-तिकडे फिरण्यापेक्षा दोन पैसे घरात आले तर चांगलेच आहे, असे सांगितले जाते.नागपुरातील असंघटित कामगारांचे नेते हरीश धुरट यांनी दिलेली माहिती तर अतिशय धक्कादायक अशी आहे. गेल्या दोन वर्षांपासून बालमजुरी याकडे कुणाचेच लक्ष नाही. ना शासन याबाबत काही बोलायला तयार आहे ना प्रशासनाकडे यासाठी वेळ आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या सर्वेक्षणानुसार नागपूर शहरात तब्बल ३० हजारावर बालमजूर आहेत. त्यांच्या निर्मूलनासाठी कायदे होते. परंतु आता कायदाच लंगडा करण्यात आलेला आहे. बालमजुरी निर्मूलन कायद्यानुसार तक्रारीनुसार एखाद्या हॉटेल किंवा प्रतिष्ठानावर धाड टाकली किंवा निरीक्षण केले आणि त्या ठिकाणी मजुरी करताना एखादा बालक आढळून आल्यास त्याच ठिकाणी मालकाला २५ हजार रुपये दंड भरावा लागत असे.

 

टॅग्स :nagpurनागपूर