शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आंतरजातीय विवाह योजनेबाबत शासन उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 22:38 IST

समाजातील जातीभेदाची दरी कमी करण्यासाठी शासनातर्फे आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्याकरिता अनुदान देण्यात येते. परंतु या योजनेसंदर्भात केंद्र सरकार फारसे गंभीर नसल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देदोन वर्षानंतर मिळाला निधी : कशी राबवणार योजना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समाजातील जातीभेदाची दरी कमी करण्यासाठी शासनातर्फे आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्याकरिता अनुदान देण्यात येते. परंतु या योजनेसंदर्भात केंद्र सरकार फारसे गंभीर नसल्याचे दिसून येते. या योजनेसाठी मिळणारा निधी तब्बल दोन वर्षानंतर केंद्र सरकारतर्फे पाठवण्यात आला तो सुद्धा कमीच. अशा परिस्थितीत आंतरजातीय विवाहाबाबत केंद्र शासन खरच गंभीर आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.अनुसूचित जाती, जमाती वर्गातील व्यक्तीसोबत इतर समाजाच्या व्यक्तीने लग्न केल्यास संबंधित जोडप्यास ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते. समाजासमाजातील जातीभेद दूर व्हावे, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. आंतरजातीय विवाह करणाऱ्यांपैकी काहींना समाजात कटू अनुभवही येतात, काहींना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यांना आर्थिक मदतीसोबत प्रोत्साहन या योजनेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आहे. ही योजना सामाजिक न्याय विभागामार्फत राबवली जाते. या योजनेसाठी ५० टक्के निधी राज्य व ५० टक्के निधी केंद्राकडून दिला जातो. दोन्ही सरकारचा निधी आल्यानंतर लाभार्थ्यांना निधी देण्यात येतो. परंतु निधी देण्यास सरकारकडून नेहमीच दिरंगाई होते. परिणामी लाभार्थ्यांना अनुदान मिळण्यास विलंब होतो.मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारचा ९४ लाखांचा निधी प्राप्त झाला. परंतु केंद्राचा निधी मिळाला नसल्याने त्याचा उपयोग करता आला नाही. आता केंद्र सरकारने ९४ लाखांचा एक हप्ता दिला. त्यामुळे १ कोटी ८८ लाखांचा निधी आहे. विभागाकडून ९५० वर लाभार्थी आहेत. या निधीतून जवळपास ३७५ जोडप्यांना निधी देता येणार आहे. उर्वरित जोडप्यांना अनुदानासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :marriageलग्नGovernmentसरकार