शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

शासकीय आयुर्वेद महाविद्यालय :  बीएएमएसच्या २५ टक्क्यांनी वाढल्या जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 01:21 IST

वैद्यकीय महाविद्यालयांमधील एमबीबीएसच्या १० टक्क्याने जागा वाढल्या असताना आता आयुर्वेद महाविद्यालयातील ‘बीएएमएस’ या पदवीच्याा जागा २५ टक्क्याने वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे नागपुरातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या पदवीच्या १०० वरून १२५ जागा होणार आहेत, तसे आयुष मंत्रालयाचे पत्र शनिवारी अधिष्ठात्यांना प्राप्त झाले.

ठळक मुद्दे१०० वरून १२५ झाल्या जागा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : वैद्यकीय महाविद्यालयांमधील एमबीबीएसच्या १० टक्क्याने जागा वाढल्या असताना आता आयुर्वेद महाविद्यालयातील ‘बीएएमएस’ या पदवीच्याा जागा २५ टक्क्याने वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे नागपुरातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या पदवीच्या १०० वरून १२५ जागा होणार आहेत, तसे आयुष मंत्रालयाचे पत्र शनिवारी अधिष्ठात्यांना प्राप्त झाले.विशेष म्हणजे, राज्यभरात चार शासकीय तर १८ खासगी शासकीय अनुदानित आयुर्वेद महाविद्यालये आहेत. एकूण २२ आयुर्वेद महाविद्यालयांना यावर्षीपासून २५ टक्के वाढीव जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे.नागपुरातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाची स्थापना झाली तेव्हा केवळ पदवी अभ्यासक्रमाच्या २५ जागा होत्या. पुढे यात वाढ होऊन १०० जागा वाढल्या. नुकतेच राज्यातील खासगीसह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना (ईडब्ल्यूएस) १० टक्के आरक्षण लागू करण्याकरिता ‘एमबीबीएस’च्या ९७० जागा वाढविण्यात आल्या. त्याच धर्तीवर ‘ईडब्ल्यूएस’साठी १० टक्के तर मराठा विद्यार्थ्यांसाठी १२ टक्के आरक्षण असे एकूण २२ टक्के आरक्षण आयुर्वेदाच्या ‘यूजी’ प्रवेशासाठी जाहीर करण्यात आले. केंद्र शासनाने जुन्या आरक्षणाला धक्का न लावता सरसकट २५ टक्के आरक्षण विद्यार्थ्यांच्या हितासाठी वाढवून दिले आहे.सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनने (सीसीआयएम) ५ जुलै २०१९ रोजी २५ टक्के जागा वाढविण्याचा निर्णय घेतला होता, तसे पत्र राज्य शासनाच्या आयुष मंत्रालयाला पाठविले होते. आयुष मंत्रालयाने १८ जुलैला यावर निर्णय घेतला. तसे पत्र शनिवार २० जुलै रोजी सर्व अधिष्ठात्यांना प्राप्त झाले. या पत्रात येत्या शैक्षणिक वर्षापासून प्रवेश देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना फायदा होईलशासनाच्या निर्णयानुसार ‘बीएएमएस’च्या २५ टक्के जागा वाढल्या आहेत. तसे पत्रच शनिवारी प्राप्त झाले. यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून १०० ऐवजी १२५ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. आर्थिकदृष्ट्या मागास व मराठा विद्यार्थ्यांनाही या निर्णयामुळे संधी मिळणार आहे. सोमवारपासून ही प्रवेश प्रक्रिया सुरू होईल.डॉ. गणेश मुक्कावारअधिष्ठाता, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय

टॅग्स :Government ayurvedic college nagpurशासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर