शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय आयुर्वेद रुग्णालय : ३० लाखांतून होणार पंचकर्म विभागाचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 23:51 IST

मेयो, मेडिकलसोबतच आता शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयलाही यंत्र खरेदी व बांधकामासाठी जिल्हा नियोजन समिती निधी उपलब्ध करून देणार आहे. याचा फायदा पहिल्याच वर्षी आयुर्वेद रुग्णालयाला झाला. पंचकर्म विभागासाठी ३० लाख रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली. यामुळे रुग्णालयाच्या विकासाला सुरुवात झाल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्देजिल्हा नियोजन समितीकडून पहिल्यांदाच निधीला मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेयो, मेडिकलसोबतच आता शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयलाही यंत्र खरेदी व बांधकामासाठी जिल्हा नियोजन समिती निधी उपलब्ध करून देणार आहे. याचा फायदा पहिल्याच वर्षी आयुर्वेद रुग्णालयाला झाला. पंचकर्म विभागासाठी ३० लाख रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली. यामुळे रुग्णालयाच्या विकासाला सुरुवात झाल्याचे बोलले जात आहे.शासकीय आयुर्वेद रुग्णालय प्रशासनाने इतर रुग्णालयांप्रमाणे जिल्हा नियोजन समितीमध्ये (डीपीडीसी) आयुर्वेद रुग्णालयाचाही समावेश करावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. या मागणीवर सकारात्मकता दाखवित जिल्हाधिकाऱ्यांनी आयुर्वेदाचाही ‘डीपीडीसी’मध्ये समावेश केला. अधिष्ठाता डॉ. गणेश मुक्कावार यांनी ‘डीपीडीसी’कडे पाच वर्षांसाठी २०० कोटींच्या विकासकामांचा बृहत् आराखडाच सादर केला. या आराखड्यात विद्यमान बाह्यरुग्ण इमारतीचे नुतनीकरण करणे, विद्यमान इमारतींच्या नुतनीकरणासह नवीन १३० खाटांची सुसज्ज इमारत निर्माण करणे, अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, नवीन इमर्जन्सी ग्रीड ट्रान्सफार्मर बसविणे, ई.एस.आर. सिस्टीम बसविणे, ईटीपी व एसटीपी प्लांट बसविणे, लिनन वॉशिंग सेक्शन, भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषद दिल्लीच्या मानकानुसार बाह्यरुग्णांकरिता केंद्रीय नोंदणी कक्ष निर्माण करणे, रुग्णालयातील बाह्यरुग्ण स्वच्छतागृहासह दिव्यांगाकरिता स्वच्छतागृह निर्माण करणे, रुग्णालयात विविध प्रकारची यंत्रसामुग्री खरेदी करणे, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या आवश्यक यंत्रसामुग्री तसेच फर्निचर खरेदी करणे आदींसह एकूण १६ विकासकामांचा प्रस्ताव दिला आहे. यात पहिल्या टप्प्यात पंचकर्म विभागाच्या विकासासाठी ३० लाखांच्या निधीला मंजुरी देण्यात आली. या निधीमधून रुग्णालयाच्या पहिल्या माळ्यावर अद्ययावत पंचकर्म विभाग तयार करण्यात येणार आहे. यामुळे रोज ५०० नागरिक पंचकर्म करू शकणार आहेत.आता विकासकामाला गतीशासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गणेश मुक्कावार म्हणाले, ‘डीपीडीसी’त आयुर्वेद रुग्णालयाचा समावेश झाल्याने आता खऱ्या अर्थाने विकासाला गती मिळणार आहे. रुग्णालयाच्या विकास कामाचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर करण्यात आला आहे.

टॅग्स :Government ayurvedic college nagpurशासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय, नागपूरfundsनिधी