शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कामगार आयुक्त विभागाचा कारभार ‘रामभरोसे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 00:59 IST

विदर्भाच्या अकराही जिल्ह्यात कामगारांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेले अप्पर कामगार आयुक्त कार्यालयाचा कारभार सध्या रामभरोसे सुरू आहे. आयुक्त श्रेणीचे आणि अधिकारी वर्गांची ७० टक्के पदे रिक्त आहेत. केवळ नागपूर जिल्ह्यासाठी मंजूर असलेले सहायक कामगार आयुक्तांची चारही पदे रिक्त असल्याने शासन हा विभागच बंद करण्याच्या तयारीत आहे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्देवर्ग १ व २ ची ७० टक्के पदे रिक्त : नागपूर जिल्ह्यात सहायक कामगार आयुक्तांची चारही पदे रिक्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भाच्या अकराही जिल्ह्यात कामगारांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेले अप्पर कामगार आयुक्त कार्यालयाचा कारभार सध्या रामभरोसे सुरू आहे. आयुक्त श्रेणीचे आणि अधिकारी वर्गांची ७० टक्के पदे रिक्त आहेत. केवळ नागपूर जिल्ह्यासाठी मंजूर असलेले सहायक कामगार आयुक्तांची चारही पदे रिक्त असल्याने शासन हा विभागच बंद करण्याच्या तयारीत आहे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.कामगार आयुक्त कार्यालयावर कामगार व कारखानदारांमध्ये समन्वय साधणे, औद्योगिक शांतता कायम करणे तसेच विविध कामगार कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी असते. त्यामुळे कामगारांच्या हिताच्या दृष्टीने हा विभाग महत्त्वाचा असा आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून अपुऱ्या मनुष्यबळामुळे विभागाच्या कामावर विपरीत परिणाम झाला आहे. कामगारांच्या समस्या मार्गी लागत नसल्याने व अनेक प्रकरणे प्रलंबित असल्याने कामगार संघटनांमध्ये रोष निर्माण झाला आहे. संपूर्ण विदर्भाच्या ११ जिल्ह्याची जबाबदारी असलेल्या या विभागातील अधिकारी प्रवर्गातील वर्ग १ ची ७० टक्के पदे रिक्त पडली असल्याने कामावर त्याचा विपरीत प्रभाव पडला आहे.सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, विदर्भासाठी सहायक कामगार आयुक्तांची १० पदे मंजूर आहेत. त्यापैकी केवळ ४ कार्यरत असून ६ पदे रिक्त आहेत. धक्कादायक म्हणजे नागपूर जिल्ह्यासाठी असलेली चारही पदे रिक्त असल्याची माहिती दिली जात आहे. दुसरीकडे सरकारी कामगार अधिकाऱ्यांच्या मंजूर असलेल्या २५ पैकी २० पदे रिक्त आहेत. तसेच सुविधाकारा(शॉप इन्स्पेक्टर)च्या विदर्भासाठी मंजूर असलेल्या ४३ पदांपैकी तब्बल ३३ पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. केवळ नागपूरचा विचार केल्यास जिल्ह्यासाठी सरकारी कामगार अधिकाऱ्यांच्या मंजूर १२ पदांपैकी केवळ ३ कार्यरत आहेत. त्यापैकी एका अधिकाऱ्यावर माथाडी मंडळाच्या सचिवपदाचे पूर्णवेळ पद देण्यात आले असल्याने त्याचाही प्रभाव कामावर दिसून येतो. जिल्ह्यासाठी मंजूर असलेल्या सुविधाकारांच्या १८ पैकी ११ पदे रिक्त असल्याची माहिती आहे.विदर्भातील इतर जिल्ह्यांचा विचार केल्यास भंडारा, चंद्रपूर व अमरावती येथे सहायक कामगार आयुक्त कार्यरत असून, गोंदिया व अकोला जिल्ह्यात हे पद रिक्त आहे. सरकारी कामगार अधिकाऱ्याचे वर्धा, गडचिरोली, बुलडाणा व एक तालुकास्तरावर असलेल्या तुमसरचे पद रिक्त आहे.

टॅग्स :Employeeकर्मचारीcommissionerआयुक्त